November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

जातीयवादी लोकांकडून पुन्हा एक बौद्ध तरुण अक्षय भालेराव याची हत्या

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून जातीयवादी लोकांकाढून बुद्ध तरुण अक्षय भालेराव याची नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात अक्षय भालेरावची हत्या करण्यात आली

नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील बौद्ध तरुण ‘अक्षय भालेराव’ याने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती साजरी केली म्हणून याचा राग मनात धरून तेथील काही जातीवाद्यांनी त्याची निर्घृण पणे हत्या केली. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. याचा निषेध म्हणून आणि या हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष संघटना यांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहेत.

महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात अजूनही जाग आलेली नाही मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री कोणीही बोंढार गावात भेट दिलेली नाही, अक्षय भालेरावची हत्या करणा-यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, दोषींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविण्यात यावा, उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करावे, निष्पक्ष तपास करुन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, शिवाय नांदेड जिल्ह्यात वाढत असलेल्या जातीय अत्याचाराला पायबंद घालावा व पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव असून पोलिसांनी न्यायाच्या दृष्टीने हे प्रकरण हाताळावे, आदी मागण्या बोद्ध समाज्याच्या वतीने केल्या जात आहेत याची सरकारने दाखल घ्यावी अन्यथा जनतेच्या वतीने तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असे अनेक पक्ष असंघटना याच्या वतीने स्थानिक प्रशासन यांना निवेदन देण्यात येत आहेत