January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

प्रज्ञा करुणा विहार, देगावचाळ, नांदेड येथे भारतीय संविधान दिवसाचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न

दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.00 वाजता प्रज्ञा करुणा विहार, देगावचाळ, नांदेड येथे 75 वा संविधान दिवस (अमृत महोत्सव) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्ध व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस दीप, धूप व पुष्प अर्पण करून झाली. सर्व उपस्थित मान्यवरांनी अभिवादनानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण केले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांचे भाषण झाले

तेजस्विनी नरवाडे, आराध्या वाघमारे , समृद्धी गजभारे , खुशी गोडबोले , बोधत्व जोंधळे , संकेत बेंद्रीकर , सम्राट चिंतोरे
शितल लोखंडे , श्वेता खाडे , स्वरा खाडे , प्रणिता हाटकर , रूपाली खाडे , दिपाली खाडे

यांनी संविधान, बुद्ध विचार आणि सामाजिक बांधिलकी या विषयांवर आपली मनोगते व्यक्त केली.

मान्यवरांचे मार्गदर्शन

भारतीय बौद्ध महासभा, शहर शाखा नांदेड उत्तरचे संघटक आयु. सुभाष लोखंडे यांनी मार्गदर्शन करत संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान: उपासिका चौत्राबाई चिंतोरे

प्रास्ताविक व सूत्रसंचालन: उपाशीका शिल्पा लोखंडे

आभार प्रदर्शन: उपा. रेखाताई हिगोले

सरणत्तय गाथा घेऊन आणि उपस्थितांना पेढे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

उपस्थिती

या कार्यक्रमास उपासिका सुमनबाई वाघमारे, आशाबाई हाटकर, शिलाबाई राघोजी सातोरे, निर्मलाबाई पंडित, पारूबाई हिंगोले, रेखाबाई पंडित, शिलाबाई रामा सातोरे, लक्ष्मीबाई गोडबोले, सोनाबाई राजभोज तसेच परिसरातील महिला, पुरुष, उपासक–उपाशीका, विद्यार्थी, आणि लहान मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
समारोप
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.