छत्रपती संभाजीनगर : केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जीवनप्रवास मांडणारे दोनशे फूट बॅनर शहरात लावण्यात आले आहे. कोणत्याही नेत्याचा फोटो नाही, कोणत्याही एका कार्यकर्त्याचे नाव नाही. यातून हर्सूल येथील तक्षशिला नगर व एकतानगर मित्रमंडळाने समाजात एक वेगळा संदेश दिला आहे.
राज्यात कोणत्याही महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी असो, यावेळी अभिवादनाचे छापलेले बॅनर आपल्याला जागोजाग दिसतात. या बॅनरवर नेते व कार्यकर्त्यांचा फोटो मोठा आणि महापुरुषांचा फोटो छोटा असे बॅनर झळकताना दिसतात.
सध्या राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जल्लोषात तयारी सुरू आहे. यात अनेक नेते, पदाधिकारी, जयंती उत्सव समिती, संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात येत आहे. या बॅनरमध्ये महापुरुषांचे फोटो छोटे आणि नेते, कार्यकर्त्यांची फोटो मोठे असे चित्र आहे. परंतु याला अपवाद ठरणाऱ्या एक डिजिटल बॅनरची चर्चा सध्या शहरात होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल येथील तक्षशिलानगर व एकतानगर येथील तरुण मित्रमंडळाने डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील कार्याचा आढावा घेणारे दोनशे फूट बॅनर छापले आहे. या बॅनरवर डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास ते त्यांनी समाज, देशासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेणारा मजकूर आहे.
More Stories
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.