बुध्दांना एका पंडितने विचारले की, तथागत आपण लोकांना सांगता देव नाही, आत्मा नाही, स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही.
तथागत म्हणाले, मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो .
पंडित म्हणाला, मला सोपे करुन सांगा .
मग तथागत म्हणाले,
माणसाला पाच बाह्य ज्ञानेंद्रीय आहेत .
ज्या द्वारे माणूस सत्य जाणतो.
१)डोळे.
२)कान.
३)नाक .
४)जीभ.
५)त्वचा.
माणूस डोळ्यांनी बघतो,
कानाने आवाज ऐकतो,….
नाकाने वास घेतो,
जीभेने चव घेतो, …..
त्वचेने स्पर्श जाणतो ….
या पंच ज्ञानेंद्रीयांपैकी कधीकधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रीयांचा वापर करुन माणूस सत्य जाणतो.
पंडित विचारतो, कसे ?
पाणी डोळ्यांनी दिसत पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते.
गोड की खारट कळायला जीभेची मदत घ्यायला लागते.
पंडित म्हणाला, बरोबर. पण मग देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय ?
तथागत म्हणाले, तुम्ही हवा पाहू शकता ?
पंडित म्हणाला, नाही.
याचा अर्थ हवा नाही, असा होतो का ?
पंडित म्हणाला, नाही.
हवा दिसत नसली तरी ती आहे .कारण तिच आस्तित्व नाकारता येत नाही,
आपण श्वासोच्छवास करताना हवाच आत-बाहेर सोडतो.
वा-याची झुळूक आली की, आपल्याला जाणवते.
झाड, पान हवेने हळतात, ते दिसत.
तथागत म्हणाले,
आता मला सांगा देव तुम्हाला पंच ज्ञानेंद्रीयांनी जाणवतो का ?
पंडित म्हणाले, नाही .
तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे ?
पंडित- नाही.
तुमच्या आई-वडिलांनी पाहिल्याच सांगितलंय ?
पंडित- नाही.
मग पूर्वजांपैकी कुणी पाहिल्याच ऐकलंत ?
पंडित -नाही.
मग तथागत म्हणाले,
आजवर कुणीच पाहिल नाही .
आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रीयांनी जे जाणता येत नाही ते सत्य नाही.
त्याला गृहीत धरायचे नाही. कारण त्याचा उपयोग नाही.
ज्ञानी पंडिताला ब-यापैकी पटायला लागलं होते,
तरी त्याने प्रश्न विचारला…
तथागत ठिक आहे, पण मग आपण जीवंत आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे. हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही ?
तथागत पंडिताला म्हणाले,
तुम्ही सांगता आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही .
पंडित म्हणाला, हो. बरोबर आहे.
मग तथागत म्हणाले, मला सांगा माणूस मरतो म्हणजे काय ?
पंडित म्हणाला,
आत्मा त्या माणसातून निघून गेला की माणूस मरतो .
मग मला सांगा आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो ?
पंडित -आत्मा शरीर सोडतो.
का सोडतो आत्मा शरीर ?
कंटाळा आला म्हणून ?
पंडित-माणसाच आयुष्य संपल्यावर.
तथागत म्हणाले,
तसे असेल तर सगळी माणसं शंभर वर्ष जगली पाहिजे .
अपघात, आजार झाल्यावरही उपचार न करता जगली पाहिजे.
पंडितजी – तथागत बरोबर आहे तुमचं.
पण माणसात जीव आहे त्याला काय म्हणाल ?
तथागत म्हणाले,
तुम्ही दिवा पेटवता, तेव्हा ते एक भांड, भांड्यात तेल, तेलात वात असते.
ही वात पेटवायला अग्नी देता. बरोबर ?
पंडित – बरोबर .
तथागत – मग मला सांगा वात कधी विझते ?
पंडित – तेल संपत तेंव्हा .
तथागत -आणखी ?
पंडित – तेल आहे पण वात संपते तेंव्हा.
तथागत-आणखी ?
पंडितजी काहीच बोलले नाहीत.
तेंव्हा तथागत म्हणाले,
पाणी पडले, वारा आला, पणतीच फुटली तर पणती विझु शकते.
मानव देह ही एक पणती समजा आणि जीव म्हणजे आग (उर्जा )
सजीवाचा देह चार तत्वांनी बनलेला आहे .*
१) पृथ्वी -घनरुप पदार्थ (माती)*
२) आप – द्रवरुप पदार्थ (पाणी, स्निग्ध तेल ).
३) वायु – वारा.
४) तेज -उर्जा, उष्णता.
या चार पैकी एक पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो .
उर्जा बनणे थांबते .
यालाच म्हणतात माणूस मरणे.
सजीव माणूस मेल्यानंतरचा जो आत्मा आहे,
तुम्ही म्हणता तो देवासारखाच अस्तित्वहीन आहे .
देव आहे की नाही?
आत्मा आहे की नाही?
या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवीत नाही .
धम्म माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाने कसं आदर्श जीवन जगावं, याचे मार्गदर्शन करतो.
कर्म केल्यावर काय परिणाम होतात? ते सांगा
धम्म जिवंतपणी स्वर्ग उपभोगण्याची माणसाला संधी उपलब्ध करतो आणि जिवंतपणी याच जन्मात अज्ञानामुळे नरक भोगावा लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो .
अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म..
‘सर्वांचे मंगल होवो.’🌷🙏🏻
More Stories
🧡 बुद्धांचे मैत्रीविषयक विचार 🧡 Buddha’s Thoughts On Friendship
🐍 Nag Panchami and Buddha Dhamma – A Buddhist Perspective 🐍 नाग पंचमी : परंपरेतून समजून घेणे
Buddhist Story अंगुलिमाल – खुनी भिक्षू बनतो!