महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणीतील विद्रोही फाउंडेशनच्या वतीने 3 क्विंटल 69 किलो तांदळापासून 1600 चौरस फूट अभूतपूर्ण प्रतिमा साकारली.
परभणी: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परभणी शहरात एक अत्यंत अभिनव आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला. विद्रोही फाउंडेशनने बिट्टू दातार यांच्या संकल्पनेतून चक्क तांदुळाचा वापर करून बाबासाहेबांची भव्य आणि आकर्षक प्रतिमा साकारली. ही कलाकृती केवळ अभिवादन नव्हते, तर त्यामागे अन्नदानाचा उदात्त सामाजिक उद्देश होता.
१६०० चौरस फुटांवर कलाकृतीशहरातील वांगी रोड भागातील ज्योतिर्गमयी शाळेसमोरील प्रांगणात ही अभूतपूर्व प्रतिमा साकारण्यात आली. कलाकार उद्देश पजळे यांनी आपल्या कलेतून या प्रतिमेला साकार रूप दिले. यासाठी तब्बल ३ क्विंटल ६९ किलो तांदूळ वापरण्यात आला. ही कलाकृती साधारण १६०० चौरस फूट इतक्या मोठ्या जागेवर साकारल्यामुळे, उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती आणि अनेकांनी या कलात्मक अभिवादनासमोर नतमस्तक होत आदराने वंदन केले.
अभिवादन, मग अन्नदानया अभिवादनाचे सर्वात महत्त्वाचे आणि भावनिक वैशिष्ट्य म्हणजे त्यामागे असलेला सामाजिक हेतू. या प्रतिमेसाठी वापरण्यात आलेला सर्व तांदूळ, महापरिनिर्वाण दिनानंतर गोरगरीब आणि गरजू लोकांना दान करण्यात येणार आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर उपेक्षितांसाठी आणि वंचितांसाठी लढा दिला. त्यांच्याच विचारांना अनुसरून, अभिवादनाची ही पद्धत निवडण्यात आल्याचे विद्रोही फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले. परभणीतील या अनोख्या कलाकृतीमुळे अभिवादन आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
- आयोजक: विद्रोही फाउंडेशन, परभणी.
- निमित्त: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर).
- कलाकृती: ३ क्विंटल ६९ किलो तांदळापासून १६०० चौरस फुटांची भव्य प्रतिमा.
- उद्देश: महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांना आदरांजली वाहणे आणि सामाजिक संदेश देणे, तसेच गरजूंपर्यंत अन्न पोहोचवणे.
- संकल्पना: बिट्टू दातार यांनी या अभिनव संकल्पनेला आकार दिला आहे
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हे तांदूळ गोरगरीब गरजू लोकांना वाटप करण्यात येणार आहेत याच प्रतिमेचे ड्रोन ने घेतलेले खास व्हिडिओ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून अनेकजण मुंबईतील चौत्यभूमीवर दाखल झाले आले आहेत.
More Stories
विश्वशांती परिषदेत भारत-श्रीलंकेतील भंतेदरम्यान करार, श्रीलंकेत उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन
बुद्ध पौर्णिमा 2026 : बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व, इतिहास आणि कशी साजरी करावी | Buddhist Bharat
मुत्सद्दी स्टोबडन यांनी हिमालयीन बौद्ध धर्मावर एक चिरस्थायी वारसा सोडला आहे.