January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध तत्त्वज्ञानामुळे जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

इंडोजपानी सांस्कृतिक संघटनेचे चिटणीस श्री. मुर्ती व त्यांच्या पत्नी यांच्या सत्कारप्रसंगी नवी दिल्ली येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

दिनांक १५ फेब्रुवारी १९५३ रोजी इंडोजपानी सांस्कृतिक संघटनेचे चिटणीस श्री. मुर्ती व त्यांच्या पत्नी यांचा श्री. राजभोज यांनी दिल्ली येथे सत्कार केला. या सत्काराला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, माईसाहेब आंबेडकर, रोहिणीकुमार चौधरी, ज. भोसले, आमदार कृष्णा आणि इतर १५-२० आमदार हजर होते. श्री. बापूसाहेब राजभोज यांनी जपानमधील आपल्या दौ-याची थोडक्यात हकीकत सांगितली आणि बौद्ध धर्माच्या विकासाचे तेथे आपल्याला जे दर्शन घडले त्याचेही वर्णन केले. श्री. मूर्ती आणि त्यांची संघटना यांचे आपल्याला अनमोल सहाय्य झाले याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले छोटेसे भाषण….

याप्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
जगापुढे विशेषताः आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर, कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे. बुद्धाचे तत्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर व शांततेच्या नजिक जाईल.

***

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा तेथे जमलेल्या लोकांवर अत्यंत परिणाम झाला व बौद्ध तत्वज्ञानाबद्दल एक नवीनच दृष्टी घेऊन त्यांच्यापैकी काही जण बाहेर पडले.

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे