September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

Nashik काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मृतिदिन

Nashik

नाशिक : पंचवटीतील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी ( दि. २) सायंकाळी गोदाकाठ भीमगीतांनी दुमदुमून निघाला. निमित्त होते, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन समिती व भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समितीच्या वतीने आयोजित भीमगीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करण्यात आला होता. सत्याग्रह लढ्याच्या स्मृतीदिनानिमित्त गोदाकाठी गौरी पटांगणावर दोन्ही समितीच्या वतीने अभिवादन सभा व भीमगीतांच्या मैफलीचे आयोजन सालाबादप्रमाणे करण्यात आले होते. यावेळी संत गाडगे महाराज पुलाखाली झालेल्या अभिवादन समितीच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते गंगाधर आंबेडकर हे प्रमुख अतिथी दीपप्रज्वलन करताना गंगाधर आंबेडकर, प्रकाश पगारे, किशोर घाटे, संजय आडगावकर आदी.
म्हणून उपस्थित होते. यावेळी मंचावर संजय आडगावकर, राकेश महाडिक, फकिरराव जगताप, माजी नगरसेवक भगवान दोंदे, सुरेश दलोड, नवनाथ नाईकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश पगारे होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक स्वागताध्यक्ष किशोर घाटे यांनी केले. प्रारंभी बुद्धवंदना घेण्यात आली. यानंतर युवा गायक चेतन लोखंडे, संतोष जोंधळे, आम्रपाली पगारे, दर्शना तेलुरे यांनी विविध भीमगीतांचा नजराणा त्यांच्या सुमधुर आवाजात सादर केला.