“मला भारत बौध्दमय करायचा आहे.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“धन्य आहेत ते लोक जे उन, वारा, पाऊस यांची परवा न करता समाज उध्दाराचे कार्य करतात” डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा सुरुवात दि.७/२/२०२५ रोजी सकाळी ११.३० पासून त्यागमुर्ती रमाई स्मारक वरळी / चैत्यभुमी दादर ते संदेशभुमी, धुळे
सन्माननीय बौध्द बंधु (उपासक) आणि भगिनींनो (उपासिका) सप्रेम जय भीम… नमो बुध्दाय…
दि.३१ जुलै १९३७ रोजी व १७, १८, १९, जुन १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वाघाडी, ता. शिरपूर येथील बैल पोळ्याच्या केस संदर्भात तात्कालिक जिल्हा न्यायदंडाधिकारी पच्छिम खान्देश अर्थात आजचा धुळे जिल्हा येथे अपिलावर कामकाज करण्यासाठी आले होते. त्यावेळी धुळेकर जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्टेशन पासून ते ट्रॅव्हलर्स बंगला म्हणजे आत्ताची संदेश भुमी पर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी धुळेकर जनतेला पहिल्यांदा संदेश दिला. सर्व उल्लेख महाराष्ट्र शासन द्वारा प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण खंड १८ भाग २ मध्ये छापून आला आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भुमीचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्था धुळे च्या वतीने त्याग मुर्ती रमाई आंबेडकर स्मारक वरळी- मुबई, चैत्य भुमी दादर मुंबई ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भुमी धुळे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यागमुर्ती रमाई स्मारक वरळी, मुंबई येथून सुरवात होणार आहे तसेच दि. २३/०२/२०२५ रोजी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भूमी धुळे बसस्थानका जवळ बौध्द परिषद होऊन समारोप होणार आहे. तरी सदर संदेश यात्रा ही त्यागमुर्ती रमाई स्मारक, वरळी, मुंबई, चैत्यभूमी दादर, घाटकोपर, ठाणे, भिवंडी, शहापूर, कासारा, इगतपुरी, घोटी, नाशिक, ओझर, पिंपळगांव, चांदवड, मालेगांव, चाळीसगांव, भडगांव, पाचोरा, जळगांव, पाळधी, एरंडोल, पारोळा, अमळनेर, धरणगांव, चोपडा, शिरपूर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, शहादा, प्रकाशा, तडोदा, नंदुरबार, खांडबारा, विसरवाडी, नवापूर, साक्री, या मार्गाने संदेश भूमी धुळे येथे बौध्द परिषद होऊन समारोप कार्यक्रम करण्यात येणार आहे तरी या मार्गावरील तमाम बौध्द बांधवांनी मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थीकलश संदेश यात्रा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती, धुळे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्था धुळेच्या वतीने करण्यात येत आहे.
संदेश यात्रेचा उद्देश
१) बौध्द धम्माचा प्रचार प्रसार व्हावा.
२) संदेश भूमीचा प्रचार प्रसार व्हावा.
३) धुळे (संदेश भूमी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच अस्थी ह्या १९५६ पासून असुन सुध्दा पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रचार प्रसार झालेला नाही म्हणून हि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी कलश संदेश यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
४) महाराष्ट्र शासनाने दि.१२/१०/२०१७ रोजीचा शासन निर्णायानुसार महाराष्ट्रतील ३५ स्थळे घोषित केले गेले आहेत तसेच ४० वे स्थळ संदेश भूमीला स्मारक घोषित करुन विकास करण्यात आवा.
आयोजक : संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती, धुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्था, धुळे अध्यक्ष : आनंद सैंदणे मो. 9325031307/8767000923
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा मार्गक्रमण खालील प्रमाणे
दि. ७/२/२०२५ रोजी सकाळी ११.३० रमाई स्मारक वरळी / चैत्यभूमी दादर
दि. ७/२/२०२५ ठाणे, मुक्काम
दि. ८/२/२०२५ शहापूर, मुक्काम
दि. ९/२/२०१५ नाशिक, मुक्काम
दि. १०/२/२०२५ चांदवड, मुक्काम
दि. ११/२/२०१५ मालेगांव, मुक्काम
दि. १२/२/२०१५ चाळीसगाव, मुक्काम
दि.१३/२/१०२५ भडगांव – पाचोरा, मुक्काम
दि. १४/२/२०२५ जळगाव, मुक्काम
दि.१५/२/२०१५ एरंडोल, पारोका, अमळनेर , मुक्काम
दि. १६/२/५०२५ धरणगांव, चोपडा, मुक्काम
दि. १७/२/२०२५ शिरपूर, मुक्काम
दि. १८/५/२०१५ नरहाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, मुक्काम
दि. १९/२/२०२५ शहाद, मुक्काम
दि. २०/२/२०२५ प्रकाशा, तळोदा, नंदुरबार , मुक्काम
दि. २१/२/२०२५ खांडबारा – नवापूर, मुक्काम
दि. २२/२/२०१५ साक्री, मुक्काम
दि. २३/२/२०२५, संदेश भुमी धुळे बौध्द परिषद समारोप
धम्मदान
आदरणीय मोहदय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अस्थी कलश संदेश यात्रा करीता
धम्मदान करुन दान पारमीता करावी ही विनंती
More Stories
OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR लोकुत्तर महाविहार येथे एक दिवसीय विपस्सना शिबिराचे आयोजन…
02 March – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिन
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟