नाशिक : ५ नोव्हेंबर २०२३ रोजी राजीव नगर येथील विहारात ग्रंथ वाचन सांगता समारोप, संघ दानाचा सोहळा संपन्न झाला
मोठा भिक्शू संघ बघून मन प्रसन्न झाले येथे उपसिक यांच्या कडून चिवरदान प्रदान करण्यात आले
पूज्य भन्ते धम्मरक्षित यांनी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधी मध्ये राजगृह बुद्धविहार राजीव नगर वसाहत नाशिक येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचे वाचन करून सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितला त्याच बरोबर शील समाधी प्रज्ञा व उपोसथ शील समजावून सांगण्यात आले आहे
५ नोव्हेंबर २०२३ रोजी भिक्खूसंघाच्या उपस्तिथी मध्ये ग्रंथ वाचन सांगता समारोप निमित्त महापरित्राण पाठ संघदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . बुद्धशासना मध्ये आर्यसत् पुरुषाच्या संगतीने, आर्य धम्माने परिचित व आर्य
विनयाने विनीत कुशल कर्म करुन पुण्य संपादन केले जाते. बुद्ध शासन मध्ये संघ दान करणे व त्या मध्ये सहभाग घेणे महान कुशल कर्म समजले जाते म्हणून सर्व उपासक उपासकांनी या कुशल कर्मामध्ये सहभागी होऊन पुण्य अर्जित केले याप्रसंगी
*उपस्थित पुज्यनीय भिक्खूसंघ*
भिक्खु मिलिंद बोधी थेरो (कोपरगाव) भन्ते हर्षदीप, भिक्खु आनंद सुमनसिरी (कोपरगाव) भन्ते अवजीत भिक्खू गुरुधम्मो , आर्य धम्म दर्शनी आदि उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजक: महाप्रजापती महिला संघ, राजीवनगर वसाहत, नाशिक यांनी केले होते.
Buddhism | Buddhist Bharat | Nashik
More Stories
बौद्ध भिक्खू महाबोधी मंदिरावर नियंत्रण मिळवू पाहणारे बौद्ध धर्माचा विनियोगाविरुद्धचा संघर्ष दर्शवतात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम महामानवास अभिवादनासाठी सुटा-बुटात निघाले भीमसैनिक
NYC ने 14 एप्रिलला त्यांच्या नावाने घोषित केल्यामुळे UN ने डॉ बीआर आंबेडकर यांचा सन्मान केला