नाशिक ( प्रतिनिधी ) : नाशिकमधील त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात येत्या २४ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या निमित्ताने बोधीवृक्ष स्थापनेचे नियोजित स्थळ व सभा ठिकाण यांची पाहणी केली. तसेच यासंदर्भात प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला.
या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून मान्यवर व उपासक येणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांचे सहकार्यही महत्वाचे आहे. विजयादशमीच्या दिवशी शहरात होत असलेल्या या महोत्सवासाठी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण आग्रही आहोत. यासाठी शासनाकडून १८ कोटी ४ लाख ६७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याबाबचा शासन निर्णयही निर्गमित झाला आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे माझे आवाहन आहे.
यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, शहर अभियंता एस. आर. वंजारी, समिती सदस्य आनंद सोनवणे, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत, ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत थेरो, भदत्न संघरत्न, बाळासाहेब कर्डक, रंजन ठाकरे, बॉबी काळे, बाळासाहेब शिंदे, दिलीप साळवे, श्री.भालेराव आणि महानगरपालिकेसह विविध विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
The Boddhi Tree Grand Ceremony Nashik | बोधिवृक्ष भव्य सोहळा नाशिक
More Stories
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.