April 30, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सम्राट अशोकांचा पुतळा दीक्षाभूमीला भेट कर्नाटकातून २५ हजार अनुयायी उपस्थित राहणार, हजारो व्यक्ती धम्म दीक्षा घेणार

नागपूर : दीक्षाभूमी येथे ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन २४ ऑक्टोबरला आहे. या धम्मचक्र प्रवर्तन दिनावर सम्राट अशोक यांचा पुतळा दीक्षाभूमीवर आणण्यात येत आहे. याठिकाणी कर्नाटकातून २५ हजार अनुयायी दीक्षाभूमीवर येणार असून हजारो व्यक्ती धम्म दीक्षा घेणार आहेत.
तामिळनाडू येथील बुद्धीस्ट फॅटरनिटी मुव्हमेंट यांच्याकडून हा पुतळा तयार करण्यात आला असून दीक्षाभूमीला भेट देण्यात येणार आहे. हा भव्य असा पुतळा आहे. केरळ राज्यातील मुनदकयाम येथून एक धम्म यात्रा निघाली आहे. ही यात्रा तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणामार्गे दीक्षाभूमीवर येणार आहे.

तामिळनाडूतील बुद्धीस्ट फॅटरनिटी मुव्हमेंट या यात्रेत सहभागी झाली असून सम्राट अशोक यांचा पुतळाही याच यात्रेसोबत आणण्यात येत आहे. यात्रेदरम्यान सर्व ठिकाणी संविधान, बुद्ध अॅण्ड हिज धम्म व सम्राट अशोक यांची छोटी प्रतिमा भेट देण्यात येत आहे. ही यात्रा २१ ऑक्टोबरला नागपुरात दाखल होईल.

दीक्षाभूमीवर आल्यावर सम्राट अशोक यांचा पुतळा दीक्षाभूमी स्मारक धम्मदीक्षा दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कर्नाटक राज्यातून २५ हजार अनुयायी येणार असून बुद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.