August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

अभिवादन – प्रकाश आहिरे

जीवन लांब नसावं पण महान असावं,
दुनियेला दिसावं तस ते लहान नसावं |
भारतात जस तुमचं छोटसं गाव,
विदेशातही बाबा तुमचे मोठं नावं ||१||

भारतीय राज्यघटनेचे तुम्ही
शिल्पकार,
उचलला या देशाचा संपूर्ण भार,
दिन दुबळ्यांचा अन् शेतकऱ्यांचा आधार,
राष्ट्रप्रगती अन् समाज उन्नतीचाच तुमचा विचार ||२||

गुलामगिरीचे ओझे मानगुटीवर,
अन्याय-अत्याचार तो महाभयंकर,
संघर्ष कायम प्रत्येक टप्प्या टप्प्यावर,
लेखणीने केला त्यावर तुम्ही प्रहार||३||

भारत मातेचा हा कोहिनूर हिरा,
अन्यायाचा केला नायनाट सारा,
भीमराव होता आमचा एक सहारा,
डळमळत्या आयुष्याला दिला अर्थ न्यारा||४||

या राजाचे कष्ट राजधानीतले,
दिल्लीत जाऊन डोळे मिटविले,
अन् मुंबईत येवून शांत विसावले,
लाखो अनुयायांचे अश्रू निखळले ||५||

विविध क्षेत्रात बाबा होते तुमचे योगदान,
देशासाठी बनविले संविधान,
जगात तुम्ही होते महान,
तुमचा आम्हाला वाटतो अभिमान,
महापरिनिर्वाण दिनी बाबा तुम्हा करतो अभिवादन||६||

✍🏻शब्दांकन:- प्रकाश आहिरे 9730927305