मुंबई : अशोका वॉरियर्स टीम च्या वतीने १ ऑक्टोबर २०२३ रोजी कोंडीवते बुद्ध लेणी येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले
टीम अशोका वॉरियर्स नेहमीच बुद्ध लेणी कार्यशाळा, बुद्ध लेणी संवर्धन संदर्भात अनेक उपक्रम राबवत असतात. बुद्ध लेणी ही आमची अस्मिता आहे आणि तिची काळजी घेणे ही प्रत्येक बौद्ध धर्मीयांची जबाबदारी या ध्येयाने माझी लेणी माझी जबाबदारी आहे, त्याचाच भाग म्हणून दि १ ऑक्टोबर २०२३ रोजी कोंडीवते बुद्ध लेणी येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
कोंडीवते बुद्ध लेणी येथे वाढलेली झाडे कटींग करण्यात आली, बुद्ध लेणी परिसरात पडलेला झाडांचा पालापाचोळा स्वच्छ करण्यात आला तसेच बुद्ध लेणी मध्ये साफसफाई अशोका वॉरियर्स टीम चे वतीने करण्यात आली सदर अभियानात अनिल भारती गायकवाड, प्रज्योत कदम, कापसाताई मोरे, मंगला गोरे ताई, मंगल वाघ, अक्षय अहिरे, निर्मला ताई माने,सदस्य सहभागी होते अशी माहिती अनिल जाधव ( लेणी संवर्धक ) यांच्या कडून मिळाली.
More Stories
हरेगावात१६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
बार्टी पुस्तक स्टॉलवर ग्रंथ खरेदीसाठी भीम अनुयायांची प्रचंड गर्दी हजारो ग्रंथाची विक्री
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी परभणीत तांदळापासून साकारली त्यांची प्रतिकृती