#सांगली – बेडग ता. मिरज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात येणार्या स्वागत कमानीचा प्रश्न राज्य शासनाने तत्काळपणे मार्गी न लावल्याच्या निषेधार्थ तसेच बेडग येथील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने दुसर्यांदा काढलेल्या “माणगाव ते मुंबई मंत्रालय लाँगमार्च” आंदोलनाच्या समर्थनात सांगली जिल्ह्यातील सर्व समविचारी पक्ष व संघटनांच्या वतीने वाळवा तालुक्यातील पेठनाका येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (NH 4) “चक्काजाम आंदोलन” शनिवार दि. 23 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजाता शांततेच्या मार्गाने आयोजित करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन काल सोमवार दि. 18 सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना समविचारी पक्ष व संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांचे वतीने देण्यात आले आहे.
यावेळी समविचारी पक्ष व संघटनांचे महादेव होवाळ, सचिन जाधव, लालासाहेब वाघमारे, सचिन कांबळे, विजय माळी, सुधीर कांबळे, संजय कांबळे, किरण माने, तुषार खांडेकर, धनराज कांबळे, सागर आवळे, उमेश धेंडे, जयंत मगरे, स्वप्नील बनसोडे, परशुराम बनसोडे, भूपेंद्र कांबळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सदरच्या शांततेत करण्यात येणाऱ्या चक्काजाम आंदोलनास सांगली जिल्ह्यातील अनेक समविचारी पक्ष संघटनेसह समस्त आंबेडकरी समाजाने पाठिंबा दिला असून शनिवारी दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजाता पेठनाका येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समविचारी पक्ष, संघटनांच्या वतीने आरपीआयचे सचिन जाधव यांनी केले आहे.
More Stories
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा संपन्न झाला
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.