August 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

डायबिटीज पेशंट आहात ? सकाळच्या वेळी या पदार्थांचं सेवन करा

डायबेटीज अर्थात मधुमेह असलेल्यांनी नाश्त्यात खास पदार्थांची निवड विचारपूर्वक केली पाहिजे.

ब्रेकफास्ट चांगला केला असेल, तर दिवसभर शरीरात चांगली ऊर्जा राहते. हेल्दी अर्थात आरोग्यदायी पदार्थांनी युक्त असा नाश्ता अर्थात ब्रेकफास्ट करणं सर्वांसाठीच आवश्यक असतं. तसंच, शरीराला आवश्यक पोषक तत्त्वंही मिळतात. त्यामुळे शरीरातलं ग्लुकोजचं प्रमाण सांभाळलं जातं. डायबेटीस अर्थात मधुमेह असलेल्यांनी ब्रेकफास्टच्या पदार्थांची निवड खूप विचारपूर्वक केली पाहिजे. माहितीअभावी अनेक डायबेटीसग्रस्त व्यक्ती असे काही पदार्थ खातात, की ज्यामुळे त्यांच्या आरोग्यविषयक समस्या वाढत जातात. डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी आपल्या ब्रेकफास्टमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा, जेणेकरून त्यांना रक्तशर्करेची पातळी नियंत्रित राखता येईल, याबद्दलची माहिती आहारतज्ज्ञांकडून जाणून घेऊ या.

डाएटिशियन यांच्या म्हणण्यानुसार, डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी ब्रेकफास्टमध्ये हेल्दी फॅट आणि मीडियम प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ग्लायसेमिक लोड कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. रात्रीच्या वेळी आपलं लिव्हर रक्तशर्करा अर्थात ब्लड शुगर लेव्हल कमी करतं. त्यामुळे ब्रेकफास्टमध्ये योग्य पदार्थ न खाल्ल्यास समस्या वाढू शकतात. डायबेटीसग्रस्तांनी प्रोसेस्ड सीरियल्स अर्थात प्रक्रियायुक्त धान्य ब्रेकफास्टच्या वेळी सेवन करू नये. आहारात फायबरयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश केल्यास रक्तशर्करा पातळी नियंत्रित करण्यास मदत मिळते.

काय  पदार्थ अवश्य खावे  :

डाएटिशियन सांगतात, प्लांट बेस्ड फॅट्ससाठी ऑलिव्ह ऑइल. नट्स, बिया, नारळ आदींचा समावेश आहारात करणं चांगलं. शरीराला हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन मिळण्यासाठी चिया आणि आळशीचा हलवा, भाजलेले साल्मन मासे, क्रीम चीज आणि अक्रोडाची स्मूदी यांपैकी काही खाता येऊ शकेल. टोफू, सोया, अंडी, चणे, नट्स, बिया आदी पदार्थ प्रोटीनचे चांगले स्रोत आहेत.  डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी ब्रेकफास्टच्या वेळी ओटमील, अ‍ॅव्होकॅडो टोस्ट, होल ग्रेन ब्रेड, एग ब्रेड आदी पदार्थ खाल्ले तरी चालेल. या पदार्थांत कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी असतं.

डाएटिशियन सांगतात,  स्टार्च नसलेल्या भाज्या, म्हणजेच मिरच्या, टोमॅटो, कांदे आणि खासकरून गडद रंगाच्या पालेभाज्या डायबेटीसग्रस्तांसाठी विशेष उपयुक्त ठरतात. त्या व्यतिरिक्त अंडी, ग्रीक योगर्ट, रागी डोसा, रागी इडली, ओटमील डोसा, ओट्स स्मूदी, टोफू स्क्रॅम्बल आदी पदार्थ आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा समस्या जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.