July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर सशस्त्र टोळीने गोळीबार केला.

Chandra Shekhar Aazad : भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार, थोडक्यात वाचला जीव

उत्तर प्रदेश, 28 जून : भीम आर्मी पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात टोळ्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यातून चंद्रशेखर आझाद थोडक्यात बचावले आहे. पण एक गोळी कंबरेला चाटून गेली आहे. आझाद यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. सहारनपूरमध्ये ही घटना घडली आहे.सहारनपूरमध्ये काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर सशस्त्र टोळीने गोळीबार केला. या हल्ल्यात एक गोळी त्याच्या कंबरेला चाटून गेली.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे नेहमी संविधान बचाव त्या संदर्भात कार्य करत असतात देशात जातीभेद नष्ट होऊन समानता प्रस्थापित व्हावी संविधानाचे राज्य अबाधित राहावे अनुसूचित जाती जमाती वरील अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी ते कार्य करत असतात

सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे आणि त्याला वैद्यकीय उपचारांसाठी सीएचसीमध्ये नेण्यात आले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.