नाशिक | नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील बौद्ध तरुण ‘अक्षय भालेराव’ याने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती साजरी केली म्हणून याचा राग मनात धरून तेथील काही जातीवाद्यांनी त्याची निर्घृण पणे हत्या केली. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. याचा निषेध म्हणून आणि या हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे आणि प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या आदेशाने पार्टीच्या वतीने आज दि.8 जून 2023 रोजी, जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे यांच्या नेतृत्वात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे जोरदार निदर्शने आंदोलन करून विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
तसेच प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी दलित समाजावर निर्घृण पणे होणारे सातत्याने अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहे ही खंत व्यक्त करून निषेध केला. आणि येणाऱ्या काळात लवकरच मुंबई येथे विधान भवनावर मोठे जनआंदोलन उभे करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळूंजकर,मुरली घोरपडे,भागवत डोळस,नितीन पगारे,राज निकाळे,हिरामण गायकवाड,मिलिंद हाटे,प्रशांत पगारे,कालिदास शिंदे,रवी पगारे, सुकाअण्णा वारडे,प्रवीण पगारे,सुनिता कर्डक,अल्का निकम,मुक्ताताई खर्जुल,लक्ष्मी गडगडे,कर्णफुला गायकवाड,रमाबाई भाग्यवंत, सुनंदा कोळपे,भाग्यश्री जाधव,पद्मिनी साळवे,छाया साळवे,रोशनी बन्सी सर्व पुरुष आणि महिला भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते.
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सदोष पुतळा आंबेडकरी जनतेवर लादण्याचा प्रयत्न हाणून पाडू !
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आश्वासन मागण्या मान्य परभणी ते मुंबई लाँग मार्च स्थगित
महाबोधी महाविहारावर बौद्धांच्या नियंत्रणात सोपवण्याची मागणी तीव्र, १२ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण