जुन्नर : जुन्नर नगर पालिकेने नूतनीकरण केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे लोकार्पण गुरुवार ता.१३ रोजी सांयकाळी नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. जुन्नर नगर पालिकेने नेहरू बाजार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या प्रांगणात १९८१ मध्ये डॉ.आंबेडकर यांचा पुतळा उभारला होता.
त्यावर २००१ मध्ये मेघडंबरी करण्यात आली होती. नगर पालिका प्रशासनाने यावर्षी पुतळा व मेघडंबरीचे नूतनीकरण व परिसरात सुशोभीकरण केले आहे. मेघडंबरीच्या आतील बाजूस पीओपी करून ग्रेनाईट बसविले. स्टिलचे रेलिंगव फाऊंटन केले. विजेचे दिवे बसविण्यात आले तसेच आकर्षक फुलझाडे लावून परिसराचे सुशोभिकरण केले. या कामासाठी नगरपालिका फंडातून सुमारे आठ लाख रुपये खर्च केला असल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिली.
उपविभागीय अधिकारी मंदार जावळे,तहसीलदार रवींद्र सबनीस,पोलीस निरीक्षक नारायण पवार, मुख्याधिकारी मंगेश देवरे, शहर अभियंता विवेक देशमुख,माजी नगराध्यक्ष शाम पांडे तसेच नागरिकांच्या उपस्थितीत या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. विकास गवते यांनी सूत्रसंचलन केले.
Ambedkar Jayanti 2023
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार