बौद्ध धम्माची सुवर्णभूमी थायलंड देशात निर्माण होत असलेल्या पंचधातूच्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य मूर्तीचे कास्टिंगचे म्हणजे मूर्ती बनवण्याचा सोहळा आज दि.10 एप्रिल 2023 अत्यंत धम्ममय वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्याला भारतीय बौद्धांचा धम्मदूत म्हणून मला सादर आमंत्रित करण्यात आले आहे. थायलंडच्या चेरन्तावन येथील इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर या निसर्गरम्य व अत्यंत धम्ममय वातावरणात हा सोहळा बौद्ध विधीनुसार संपन्न झाला. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पवित्र महिन्यात हा सोहळा आयोजित केल्या बद्धल मी भारतीय बौद्धांच्यावतीने थायलंड येथील बौद्ध भिक्खूंचे व दानशूर उपासकांचे आभार मानले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धमय भारत करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत व कामात थायलंड देशाचे सहकार्य लाभत आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या प्रसंगी सोहळयाचे निमंत्रक चेरनतावन आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्राचे संचालक आदरणीय भदंत फ्रा मेथी वजिरोडोम आणि व्ही. वजिरमेथी, आदरणीय भंत लाँगफुजी, भदंत सोंगसेन फँटफियन, सिरीलक मैथाई, आदरणीय भिक्खू संघ, कॅप्टन नटकीट, आमचे मित्र सिने अभिनेते गगन मलिकजी उपस्थित होते. माझ्या जीवनातील अत्युच्च सन्मानाचा क्षण..!
नमो बुद्धाय…सप्रेम जयभीम..!
More Stories
भारतीय बौद्ध महासभा – नासिक जिल्हा, तालुका पदाधिकारी नियुक्त समारंभ
राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर येथील ‘विश्वशांती बुद्ध विहार’चे लोकार्पण…
नऊ दिवसीय अट्ठसील अनागारिका सिक्खा शिबिर-२०२४, 9 Days Atthasīla Anāgārikā Sikkhā Shibir 2024