चाल : जावू दे रे मला, जावू दे रे मला
बुद्ध पौर्णिमेचं, बुद्ध पौर्णिमेचं
हे सुखाच
पडलं चांदणं माझ्या आंगणात || धृ ||
उपासिका मी, झाले तयाची
सम्यक सम्बुद्ध, तथागताची
पालनं केलं, सद्धम्माचं ||१||
पंचशीलेचा, वाहता पाट
घेतला भरुन मी, जीवनाचा माठ
पालन केलं, पंचशीलेच ||२||
बुद्ध पौर्णिमेच्या, शितल चांदण्यात
लीन मी झाले, बुद्ध चरणात
पालन केलं, त्रिशरणाचं ||३||
अनमोल अस, धम्माच रतन
प्रभाकरा मी, केलय जतन
सार्थक झाल, या जीवनाच ||४||
निळाई : प्रभाकर बी. खिल्लारे, औरंगाबाद
More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
रात्र ती वैरीण
माझं काम मी केलं…..