महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट
नविदिल्ली – राष्ट्रपती महामहिम दौपदी मुर्मु यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेतली.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूर मधील दिक्षाभूमी येथील स्मारकाला राष्ट्रपतींनी भेट द्यावी अशी अपेक्षा यावेळी झालेल्या चर्चेत ना.रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींना व्यक्त केली. तसेच अनेक सामाजिक प्रश्नावर सुद्धा चर्चा करण्यात आली
त्यावर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना आपण जरूर चैत्यभूमी आणि दिक्षाभूमी येथे भेट देऊ असे आश्वासन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिले.
सदर भेट प्रसंगी रिपाईचे राष्ट्रीय नेते मा. भुपेशजी थुलकर साहेब ,विनोदजी निकाळजे साहेब यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते..
More Stories
भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष, भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे १२७ वर्षांनी भारतात परत येऊ शकले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक येवला कामासंदर्भात आज मुंबईत मंत्रालयात आढावा बैठक
भारताचे सॉफ्ट पॉवर टूल म्हणून बौद्ध धर्म: दक्षिणपूर्व आणि पूर्व आशियामध्ये पंतप्रधान मोदींचे डिप्लोमॅटिक प्लेबुक