कविता – माझं काम मी केलं…..
(या कवितेतून बाबासाहेब म्हणतायत…)
माझं काम मी केलं
तुम्हाला नवं जीवन दिलं
विश्व खुलं करून दिलं
आणि पंखांना बळ दिलं
आता मारा भरारी….
तुमच्यात हिम्मत असेल तेव्हढी
मी जीवनाचं मूल तंत्र या
संविधानात लिहून दिलं
माझं काम मी केलं |
मला नव्हतं पाणि प्यायला
स्वच्छ मिळत होतं
मला नव्हतं तुमच्यासारखं
सगळ्यांच्यात बसता येत होतं
मला नव्हता पलंग गादी…
एसीची हवा आणि विद्युत दिवा
मला नव्हतं मनसोक्त हिडता येत होतं
मी ते मिळवलं… व
तुम्हाला मिळून दिलं
माझं काम मी केलं…..|
मान सन्मान इज्जत नव्हती मला
नव्हता माझ्यासाठी…
कुणाचा दरवाजा खुला
साधा चपराशी सुद्धा हसायचा मला
ते जातीचं लेबल तुम्हाला काढून दिलं
माझं काम मी केलं….|
आणखीन खूप काय सांगायचं होतं
पण शरीर साथ देत नव्हतं…
तरी सुद्धा जितकं होईल तितकं
जगणं सोपं करून दिलं
आणि त्याहून सुंदर पुस्तकात लिहून दिलं
माझं काम मी केलं
आयुष्याच्या शेवटाकडे पाहताना
चिंता वाटते…ती मी चळवळीची
पेटवलेली मशाल विझेल कि
जळत राहील… पण समाधान हि
वाटते,.. मी माझ्या कोट्यावधी
लेकरांना हक्काचं घर दिलं
माझं काम मी केलं….
पुन्हा एकदा सांगतो..
तुम्ही पण तुमचं काम करा
आणि जाताना स्वतःशीच म्हणा
माझं काम मी केलं…
माझं काम मी केलं |
✍️✍️✍️✍️✍️
More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण