September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

हिंदू कोड बिल संमत व्हायलाच हवे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

” हिंदू कोड बिल ” या विषयावर समाजवादी पक्ष आणि शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या विद्यमाने भरविलेल्या महिलांच्या सभेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

शनिवार दिनांक २४ नोव्हेंबर १९५१ रोजी सायंकाळी दादर, मुंबई येथे समाजवादी पक्ष आणि शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन यांच्या विद्यमाने ” हिंदू कोड बिल ” या विषयावर महिलांची सभा आयोजित केली होती. या सभेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. सौ.काशीबाई अवसरे होत्या.

” हिंदू कोड बिल ” या विषयावर महिलांच्या जाहीर सभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
” खुद्द पंडित नेहरूंनी एक वेळ मला हिंदू कोड बिल लोकसभेतून गाळण्याची विनंती केली होती. कॉंग्रेस हा राजकीय पक्ष आहे की धर्मशाळा आहे ? अन्यथा, एकाच संस्थेत नेहरू व अनंगशयनम् अय्यंगार नि पंडित गोविंद मालवीय ही मंडळी एकत्र कशी राहू शकतात ? ” कोड बिलाने हिंदू स्त्रियांचा किती फायदा होणार आहे हे विषद करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ” नेहरू बिलाचे बाजूने असोत वा विरोधी असोत, हे बिल संमत करून घेतल्याखेरीज मी स्वस्थ बसणार नाही. बिल गेल्या ४ वर्षात केव्हाच पास झाले असते, पण नेहरूंनी ते मारून टाकले. ”

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे