September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

अशोका वॉरियर प्रणित तथागत धम्म सहल

कार्ला येथे महाबुद्ध वंदना यशस्वी करण्यात धम्म कार्यात अशोका वॉरियर चा अणू अंशा चा वाटा होता ह्यामध्ये मला अभिमान आहे,ह्याचा आर्यह असा नाही की मी श्रेय घेत आहे,,कारण मावळ पुणे मधील असंख्य तरुण लेणी संवर्धक कार्ला कार्ला येथे महा बुद्ध वंदना यशस्वी पार पाडण्यासाठी अहो रात्र झटत होते.इथे जर एकाच नाव घेतलं तर दुसऱ्यावर अन्याय होईल,त्यामुळे सर्वांचेच अभिनंदन,🙏🏽🙏🏽🙏🏽
एक महिना अगोदर अशोका वॉरियर प्रणीत तथागत धम्म सहल दिनांक 15/5/2022 रोजी कार्ला बुद्ध लेणी धम्म सहल आयोजित केली होती,आम्हाला मावळ मधील लेणी सवर्धकांनी कार्ला येथे16 मे ला कार्ला बुद्ध लेणीला महाबुद्ध वंदना आयोजित केली आहे तरी आपण 16 तारखेला सर्व उपसकाना घेऊन या अशी विनंती केली होती.परंतु मुंबई येथे सुद्धा मोठया प्रमाणात बुद्ध पौर्णिमा आयोजित केल्या जातात तसेच घरोघरी सुद्धा बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते असे आयोजकांना कळवले होते, पण अशोका वॉरियर तर्फे काही कार्यकर्ते असतील आणि आपणाला शक्यतो शाररिक मदत करतील अशी ग्वाही दिली.त्या प्रमाणे आम्ही 15 मे ला धम्म सहल आयोजित केली.
अशोका वॉरियर प्रणित तथागत धम्म सहल सकाळी थोडा उशीराच घाटकोपर वरून गाडी निघाली त्यामुळे साहजिकच कार्ला बुद्ध लेणीला आम्ही उशिरा पोहचणार त्यामध्ये मेगा हायवे वर अपघात झाला होता त्यामुळे ट्राफिक ही लागले , गाडीमधील लहान मुले,तसेच भगिनी ह्यांचा जेवणाचा वेळ चुकला होता,लहान बालकांच्या आई जवळ आपल्या छोट्या छोट्या बाळांना जो काही खाऊ होता तो ते भरवत होते,उपस्थित असणाऱ्या भिगिनी आणि बंधू त्यांच्या चेहऱ्यावर लेणी पाहण्याची उत्कंठा जाणवत होती..कोनीही नाराज न्हवत.☺️☺️☺️☺️
एक वाजता आम्ही लेणीच्या पायथ्याशी पोहचलो लेणी चढायला सुरुवात केली,काही भगिनींना कार्ला बुद्ध लेणीच्या पायऱ्या चढायचा प्रॉब्लम होता ,त्या भागीनिंबरोबर आमचे सहकारी रिक्षा ने लेणी पर्यंत घेऊन गेले.. त्यांच्या हातातील पाण्याच्या बोटल्स च्य पिशव्या आम्ही हातात घेऊन गेलो करण लेणी उच असल्यामुळे त्यांना लेणी चढायला काही प्रॉब्लम नसावा म्हणून.☺️☺️☺️☺️
जेव्हा संपूर्ण टीम लेणीत पोहचली तेव्हा सर्व उपासक आणि उपासीका ह्यांची भूख तहान विसरले जसजशी कार्ला बुद्ध लेणी ची माहिती त्यांना अशोका वॉरियर चे लेणी सकर्धक सांगत होते तसतशी त्यांची उत्कंठा वाढत होती भूख तहान विसरून सर्व ऐकत होत्र पुढील लेणी पाहण्याची भूख त्यांना लागली होती,सर्व उपासक उपासीका सहकार्य करत होते,ही सर्व माहिती देत असताना कधी संध्याकाळचे चार वाजले कळले नाही.मुख्य चैतग्रहात बुद्ध प्रतीक स्तूपाला वंदन करून त्रिसरण पंचशील ग्रहण केले.नंतर लेणी उतरायला सुरुवात केली..
लेणी उतरायला सुरुवात केली असता आमच्या भगिनींना आमच्या लेणी सवर्धकांनी एकास एक हात धरून लेणी उतरून आम्ही गाडीकडे निघालो नंतर जेवणासाठी मावळ मधील भाजे या ठिकाणी आदरणीय विकास भालेराव यांच्या संघमित्रा बुद्ध विहारात त्यांनी जेवणाची उत्तम सोय केली होती.15 मे ला अमर धनले सरांचा जन्मदिन होता.त्याच बुद्ध विहारात सरांचा जन्मदिन साजरा केला.त्यांच्या हाताने खूप सुंदर आम्हाला जेवण बनवून घातले, मावळ मधील सर्व लेणी सर्धकांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल अशोका वॉरियर तर्फे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद
भाजे येथून संध्याकाळी सात वाजता जेवण करून आमची गाडी परतीच्या प्रवासाला निघाली.आमचे लेणी सवर्धक यांनी गाडीचा चार्ज घेऊन गाडी निघाली,
16 मे ला कार्ला बुद्ध लेणी येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबुद्ध वंदना होही.त्यामुळे आम्ही काही लेणी संवर्धक तेथेच मुक्काम करणार होतो,आमच्या बरोबर औरंगाबाद इथून आलेल्या आमच्या धम्म भगिनी आदरणीय प्रो.अलका ताई डोंगरे तसेच आमच्या नेहमीधम्म कार्यात सहभागी होणाऱ्या भगिनी मयुरी मॅडम लेणी संवर्धक दुर्गेश गायकवाड,तानाजी यादव सर,राकेश कांबळे सर ह्या महा बुद्ध वंदनेला इथेच मुक्काम करून राहिले, रात्रभर मावळ मधील लेणी सवर्धकांबरोबर झेंडे लावणे कार्ला बुद्ध लेणी येथे सकाळी सहा वाजता जाऊन योग्य ठिकाणी झेंडे लावले पुन्हा भाजे ला येऊन पुन्हा महाबुद्ध वंदनेला उपस्थित राहिले,नंतर साधारण आम्ही चार वाजता परतीच्या प्रवासाला निघालो. मावळ पुण्यातील सर्व लेणी सवर्धकांनी अशोका वॉरियर ला सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. असाच साथ सहयोग आम्हाला असावा अशी अपेक्षा🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
अशोका वॉरियर प्रणित तथागत धम्म सहल
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽