July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आपला स्वार्थत्याग व धडाडी अपूर्व आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबई येथील परळ, लाल चाळ पंचातर्फे इमारत फंडास थैली अर्पण करण्याच्या समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….

दिनांक १७ मे १९४१ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता परळ, लाल चाळ पंचातर्फे इमारत फंडास थैली अर्पण करण्याचा समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रथम पंचाचे स्वागताध्यक्ष श्री. गणपत तुळशीराम सावळेकर आणि श्री. पी. एल. लोखंडे यांची भाषणे झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उठले त्यावेळी प्रचंड टाळ्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
पोलीस कमिश्नरच्या हुकूमामुळे सभा होत नाही. पण मी, आपले आभार मानण्यासाठी आलो आहे. आपल्या लोकांच्या ह्या ठिकाणी १८ खोल्या आहेत. आपली जरी येथे थोडीशी वसती आहे तरी आपण इमारत फंडास मदत करून दाखविलेला स्वार्थत्याग व घडाडी अपूर्व आहे. त्याबद्दल मी आपले अभिनंदन करीत आहे. ह्या मंडळींनी आपल्या समाजाला धडा घालून देण्यासारखे कृत्य केले आहे. सदर वेळी काही मंडळीकडून इमारत फंडासाठी आश्वासने सुद्धा मिळाली आहेत.

🔹🔹🔹

शेवटी चहापान झाले व फोटो काढण्यात आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकारात समारंभ संपविण्यात आला.

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे