November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

फाल्गुन पोर्णिमा

First World Buddhist Summit to solve universal human problems with philosophy and practice

First World Buddhist Summit to solve universal human problems with philosophy and practice

फाल्गुन पौर्णिमेला पाली भाषेत फग्गुन मासो म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः मार्च महिन्यात येते. फाल्गुन पौर्णिमेला बुद्धाच्या जीवननात काही महत्वपूर्ण घटना घडल्यात.

१. कपिलवस्तूस भगवंतांची भेट
२. पुत्र राहुलची धम्मदीक्षा
३.सिद्धार्थाचा भाऊ नंद आणि राहुल या दोघांची धम्मदीक्षा
४. समाजकंटकांनी नागवंशीयांना जाळले

१. कपिलवस्तूस भगवंतांची भेट
सिद्धार्थ राजगृहात राहात असल्याचे ऐकल्यावर राजा शुद्धोधन व परिवारातील सर्व सदस्यांना तथागताला भेटण्याची इच्छा झाली. तथागत सर्वांना उपदेश देतात मात्र आपण परिवारातील लोकच त्यांच्या उपदेशापासून वंचित आहोत असे वाटले. सारा परिवार भगवंतांच्या मुखातून धम्मप्रवचन ऐकण्यास लालाईत होता. राजा शुद्धोधनाने भगवंतास कपिलवस्तूस बोलावून त्यांचा सत्कार करण्याचे आश्वासन दिले. राजाने प्रथम सरदाराला निरोप देण्यास पाठवले मात्र सरदार व त्याचा लवाजमा तथागतांच्या धम्मोपदेशाने मंत्रमुग्ध झाला की त्यांना दिलेल्या कामाचे स्मरणही राहिले नाही व सर्वांनी तिथेच धम्मदीक्षा घेतली व सरदार लवकरच अर्हत पदास पोहीचले. त्यानंतर सिद्धार्थाचा समवयस्क बालमित्र कालुदायी यास निरोप घेउन पाठवले. मात्र तो सुद्धा ह्या अटीवर गेला की तिथे तो सुद्धा दिक्षा घेणार. राजा शुद्धोधनाने त्यास परवानगी दिली. त्याने दीक्षा घेतली आणि तिथे राहू लागला. त्यानंतर हिवाळा संपत आला होता. हाच काळ कपिलवस्तू भेटीसाठी योग्य आहे असे जाणून आपली विनंती भगवंताजवळ सादर केली. आपले पिता राजा शुद्धोधन आपल्या भेटीस उत्सुक आहेत तेव्हा कृपया आपण एकवेळ कपिलवस्तूस अवश्य भेट द्या. तथागताने मौन राहून निमंत्रण स्वीकारले. भिक्खुंचा मोठा संघ घेऊन दुसऱ्याच दिवशी कपिलवस्तू कडे रवाना झाले. तथागत आपल्या नगरीत येत आहेत ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण कपिळवस्तूत पसरली. प्रजाजन स्वागतासाठी तयारीस लागले. संपुर्ण कपिलवस्तू नव्या नववधूसारखी सजली. तथागतांनी जेव्हा नगरीत प्रवेश केला तेव्हा सर्वांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केल्या गेले. राजा शुद्धोधन महाराणी महाप्रजापती गौतमी, सर्व सरदार, दरबारी मुख्य महालाच्या दाराशी तथागतांच्या स्वागतासाठी उभे होते स्वरव स्वागताचा स्वीकार करत तथागत महालात पोहीचले तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा इ.स.पू.५२७ चा.

२. पुत्र राहुलची धम्मदीक्षा
राजा शुद्धोधन तथागतास आपल्या घरी आणले आणि साऱ्या राजपरिवाराने तथागतांच्या स्वागत केले. मात्र राहुल व त्याची आई यशोधरा स्वागतासाठी हजर नव्हती. शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठवले परंतु ती म्हणाली मी केलेल्या तपश्चर्येवर तथागतांचा विश्वास असेल तर मला दर्शन देण्यासाठी ते स्वतः येथे येतील तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि सारीपुत्र आणि महामोग्गल्यायन यांना सोबत घेऊन तडक तिच्या दालनात गेले. तथागतांना पाहिल्याबरोबर यशोधरेचा दुःखवेग होऊन तिने तथागतांच्या पायी मस्तक ठेवले आणि आक्रोश करू लागली. आजवर तिच्या भावनांप्रति असलेल्या निस्सीम भक्तीचा तिने परिचय दिला आहे. तिने सिद्धार्थाचा गृहत्यागाच्या वेळी घेतलेल्या धाडसी सल्ला आपण आपल्या सर्व प्रियजनांना सोडून परिव्राजक होण्याचा निर्णय घेतला आहात तेव्हा आपण असा एखादा जीवनमार्ग शिधून काढा को तो सकल मानवजातीस आणि पृथ्वीतलावरील सर्व प्राणिमात्रास कल्याणकारी ठरेल यावर तथागत बोलले तू खरोखरीच पुण्यवान श्रेष्ठ आचार विचारांची एक अनुपम नारी आहेस. एवढे बोलीन तथागत कशाबाहेर पडले आणि भोजन कक्षात भोजन ग्रहण करण्यास गेले.
दुःख आवेग कमी झाल्यानंतर स्वतःस सावरले. आपल्या सात वर्षाच्या राहुल ला कडेवर घेऊन खिडकीतून भगवंतांकडे बोट दाखवून म्हणाली तो बघ तुझा पिता, तुझा पिता शुद्धोधन नव्हे ते तुझे जन्मदाता आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या कडे जो अक्षयनिधी आहे तो माग कारण पित्याच्या संपत्ती मदगये वारसाहक्काने तुझा पूर्ण अधिकार आहे. राहुल तथागताकडे गेला आणि म्हणाला तुम्ही माझे पिता आहात. मला आशीर्वाद द्या व आपल्या संपत्तीचा मी उत्तराधिकारी असल्याने मला संपत्तीमध्ये वाटाही द्या यावर काहीही न बोलता भगवंत भोजन झाल्यानंतर राजवाड्याबाहेर पडून चालू लागले. त्यांच्या पाठोपाठच राहुलही चालू लागला आणि संपत्तीचा वाटा मागण्याचा तगादा लावू लागला. तथागतांनी मागे वळून बघितले व म्हणाले सोने , रुपये आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय?
राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले हो
यानंतर भगवंताने महामोग्गल्यायन याना आज्ञा दिली की राहुलचे मुंडन करण्यात यावे. त्याची राजश्री वस्त्रे, आभूषणे उतरविण्यात आली. काशायवस्त्र धारण करवून धम्मदीक्षा देण्यात आली. तेव्हा त्याचा सरीपुत्र हा गुरू होय. वरिष्ठ दान म्हणून भगवंताचे चारीकापत्र त्याच्या हाती देण्यात आले. तो दिवस र.स.पू. ५२७ चा फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होय. बुद्धाने राहुलला जो उपदेश दिला तो अंबलदिठ्ठीका राहुलोवाद सुत्ता त नोंदवला आहे.

३ सिद्धार्थाचा भाऊ नंद आणि राहुल या दोघांची दीक्षा
कपिलवस्तू येथे आले असताना भोजनपरांत तथागतांनी आपले भिक्षापात्र नंद च्या हातात दिले. नंद हा सिद्धार्थाचा मावस व सावत्र भाऊ. महाप्रजापतीने स्वतःच्या मुलाला दायीच्या स्वाधीन करून सिध्दार्थास दुग्धपान केले. अशी इतिहासातील पहिलीच घटना असावी. सावत्र आईची व्याख्याच बदलुन टाकली.
तथागत भोजन पात्र न घेताच निघून जाऊ लागले. तेव्हा नंद हातात पात्र घेतन तथागतांच्या मागेमागे जाऊ लागला. त्यांच्या पत्नीने माघारी होण्यास सांगितले मात्र माघारी झाला नाही. तथागतांच्या तात्पुरत्या निवासापर्यत नंद सोबत गेला. तिथे पोहोचल्यावर बुद्धाने विचारले भिक्षु होशील का? त्याने हो उत्तर दिले. परंतु त्याला पत्नीची अतिशय आठवण येत असे. तिचा सातत्याने विचार करीत असे.संघातील इतर भिक्खू त्याचा धिक्कार करू लागले. त्यामुळे नंद ला लज्जास्पद वाटू लागले. तो प्रामाणिक पणे साधना करू लागला आणि अल्पकाळातच त्याने अर्हतपद प्राप्त केले. ज्यादिवशी बाळ राहुलची दीक्षा झाली त्याच दिवशी नंद ची दीक्षा झाली.

४ समाजकंटकांनी बाळ नागवंशीयांना जाळले.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी समाजकंटकांनी नागवंशीय बौद्धांचा राजपुरुष जिवंत जाळला. नागयज्ञ नावाचा मोठा यज्ञ घडवून आणला. कित्येक नागवंशीयांना जिवंत जाळले. त्या लोकांनी यास होळी हे नाव दिले.

फाल्गुन पौर्णिमेच्या सर्वांना मंगल सदिच्छा 🌹🌹
उज्वला गणवीर
नागपूर