July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

याच जन्मी सर्वांगीण उन्नती करायला हवी – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

वालपाखाडी येथे भरलेल्या मराठी, गुजराती ‘अस्पृश्यांच्या’ जंगी सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….

दिनांक २ फेब्रुवारी १९२९ रोजी वालपाखाडी येथे मराठी, गुजराती ‘अस्पृश्यांची’ जंगी सभा भरली होती. ‘बहिष्कृत भारत’ व ‘समता’ या पत्रांचा प्रसार करून अस्पृश्य समाजात जागृती करणे, दिनांक ९-१० मार्च रोजी भरणाऱ्या मुंबई इलाखा महार वतनदार परिषदेस मदत देणे वगैरे ठराव या सभेत पास करण्यात आले.

या सभेत केलेल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
अस्पृश्य समाजाने आहे त्या स्थितीतच राहण्याची वृत्ती सोडली पाहिजे व इतर समाज जशी विद्या, अधिकार, संपत्ती मिळविण्याकरिता खटपट व प्रयत्न करितात त्याचप्रमाणे अस्पृश्य समाजानेही केले पाहिजेत. पुढल्या जन्मी आपले कल्याण होईल अशा पोकळ वार्तांवर विश्वास न ठेविता याच जन्मी व याच काळी आपली सर्वांगीण उन्नती करून घेऊन मानवी समाजात समानतेचा दर्जा प्रस्थापित करून घ्यावा व हिंदू समाजाला अस्पृश्यतेच्या पापातून मुक्त करावे.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे