July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आपल्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांचा प्रतिकार दलित प्राणपणाने करतील – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

गुरू रविदास यांच्या ५५५ व्या जयंतीच्या कार्यक्रमात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

दिनांक २९ जानेवारी १९५३ रोजी नवी दिल्ली येथे गुरु रविदास यांच्या ५५५ व्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय हजर होता.

गुरु रविदास यांच्या ५५५ व्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
गुरु रविदास हे तेराव्या शतकात होऊन गेले. त्यांनी दलित जनतेच्या उद्धारासाठी खूप परिश्रम केले. दलित जनतेवर होणारा अत्याचार, अन्याय जर इतःपर थांबला नाही तर दलित जनता प्रसंगी देशाच्या हिताहिताचा विचार न करता आपल्यावरील अन्यायाच्या प्रतिकारासाठी पुढचं पाऊल टाकील. दलित जनतेच्या हक्कांवर दिवसेंदिवस अतिक्रमण होत असून त्यांच्यावरील अन्याय वाढत चालला आहे. ही स्थिती जर वेळीच थांबली नाही तर स्वोद्धाराचा स्वतंत्र मार्ग आम्हाला चोखाळावा लागेल. आमच्या हितरक्षणासाठी आम्ही धीट व समर्थ नाही असा जर तुमचा समज होत असेल तर तो चुकीचा आहे.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे