एके दिवशी एका कष्टी मानसाने तथागत बुध्दास विचारले ” तथागत माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुख का…? ”
त्यावेळेस तथागतांनी त्या कष्टी मानसास एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणावयास सांगितले.
तथागतांच्या आज्ञेप्रमाणे त्या कष्टी मनुष्यने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले. त्यानंतर तथागतांनी तो संपूर्ण पेला कष्टी मनुष्याला प्यायवयास लावला आणि विचारले,”पाण्याची चव कशी वाटली ?
तेव्हा तो कष्टी मनुष्य म्हणाला,
“अतिशय खारट”
त्यानंतर तथागत त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले…सोबत आणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले… आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले?
त्या कष्टी मानसा कडून ऊत्तर आले… अतिशय मधुर
तथागतांनी विचारले, “मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही. पण… पेल्यामध्ये मात्र खारट वाटले दुःखाचे पण तसेच आहे. मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो. पण…. मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा जरा ही परीणाम होत नाही.”
विशाल मनाने जगा…
मनाची संकुचीत अवस्था टाकून द्या…
जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही..
पण काही पेल्यासारखे लहान मन करुन जगतात ते सदैव दुःखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा जरा ही परीणाम होत नाही..!
नमो बुध्दा
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
More Stories
🧡 बुद्धांचे मैत्रीविषयक विचार 🧡 Buddha’s Thoughts On Friendship
🐍 Nag Panchami and Buddha Dhamma – A Buddhist Perspective 🐍 नाग पंचमी : परंपरेतून समजून घेणे
Buddhist Story अंगुलिमाल – खुनी भिक्षू बनतो!