भाग – ८
जातिव्यवस्थेचे निर्मूलन अनुवादाच्या निमित्ताने
‘अनाईलेशन ऑफ कास्ट’ हा ग्रंथ ‘कास्ट्स इन इंडिया’ या ग्रंथात समाविष्ट करून ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा त्यांचा मानस होता. वेळेअभावी ते होऊ शकले नाही तरीपण जातिव्यवस्थेवर इतका अभ्यासपूर्ण व बौद्धिक मेजवानी देणारा बौद्धिक डिसकोर्स दुसरा कुठलाही आढळणार नाही. हा ग्रंथ म्हणजे एक ‘मास्टरपीस’ म्हणूनच ज्ञानशाखेत ओळखला जाईल एवढे मात्र खरे !
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मा. श्री. राजेश टोपे यांनी या ग्रंथास शुभेच्छा देऊन आम्हांस प्रोत्साहन दिले त्याबद्दल समिती त्यांची आभारी आहे..
महाराष्ट्र राज्याची धुरा नवे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली तसेच शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी मा.ना. विनोद तावडे यांनी स्वीकारली. या मंत्रिद्वयांनी या प्रकाशनासाठी प्रोत्साहन दिले, त्याबद्दल त्यांचे आभार समितीच्या कार्यात मा. मुख्यमंत्री व मा. शिक्षणमंत्री विशेष लक्ष देत असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांचे मार्गदर्शन लाभेल आणि समितीच्या कार्यास अधिक गती मिळेल याबद्दल खात्री आहे. त्याचबरोबर डॉ. संजय चहांदे यांनी प्रधान सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली व त्यांनी समितीच्या कार्यास गती देण्याचा मानस व्यक्त करून आम्हांला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार!
या ग्रंथनिर्मितीसाठी अनुवाद समितीने सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार ! अनुवादक प्रा. प्रकाश सिरसट यांनी वेळेत हा अनुवाद करून दिल्याबद्दल त्यांचे आभार. तज्ज्ञ म्हणून ही अनुवादसंहिता तपासून देऊन समितीस सहकार्य केलेले आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक डॉ. प्रा. अशोक गोडघाटे यांचेही आभार. या ग्रंथनिर्मितीच्या प्रक्रियेत वेळोवेळी सहकार्य करणारे आंबेडकरविचाराचे अभ्यासक व साहित्याचे संग्राहक आयु. रमेश शिंदे (मुंबई) यांचे विशेष आभार. Annihilation of caste या ग्रंथाच्या मूळ तीनही प्रती त्यांनी समितीला उपलब्ध करून दिल्यामुळे मराठी व इंग्रजीत ग्रंथ काढताना खूप मदत झाली आहे हे नमूद करणे आवश्यक आहे. माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनीही ग्रंथ चांगला व्हावा यासाठी काही मौलिक सूचना केल्या. त्यांचेही आभार समितीच्या सर्व सदस्यांनी या प्रकल्पात रस घेतला. वेळोवेळी सूचना दिल्या त्याबद्दल त्यांचे आभार. विशेषतः मा. बाळासाहेब आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, मा. नीतिन राऊत, डॉ. कासारे एम. एल.. मा. एन. जी. कांबळे, प्रा. दत्ता भगत यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना व मार्गदर्शन समितीला मोलाचे आहे. त्यांचे विशेष आभार !
🔹संकलन – नितीन संतोष पिंपळीसकर
More Stories
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ९
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ७
जातिव्यवस्थेचे निर्मूलन भाग – ६