August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

क्रांती आणि प्रति क्रांती – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट क्रमांक -३७

वेदान्त सूत्राचा काळं ठरविण्याच्या मार्गात भगवतगीतेप्रमाणेच अडचण ही आहे,की या सूत्रात अनेक बदल झाले आहेत.काही जणांच्या मते वेदान्त सूत्राच्या तीन आवृत्त्या झाल्या असाव्यात.त्यामुळे त्यांच्या काळा बाबत निश्चित काही सांगणे शक्य नाही.याबाबत व्यक्त केलेली मते केवळ अंदाजाने व्यक्त केलेली आहेत. वेदान्त सूत्रे ही बुद्धाच्या काळा नंतर लिहिलेली आहेत यात संशय नाही.कारण सूत्रात बौद्ध धम्माचा उल्लेख आहे.ती मनु नंतर लिहिलेली नसावीत, कारण मनुने आपल्या स्मृतीत त्याचा उल्लेख केलेला आहे.प्रा. किथ यांच्या मते वेदान्त सूत्रे ई. स.२०० च्या सुमारास लिहिलेली असावीत,तर प्रा. जॅकोबी यांच्यानुसार सुत्राची रचना ई.स. २०० ते ई. स. ४५० च्या दरम्यान केलेली असावी.

पुराण

१) या वेळी उपलब्ध पुराणांची संख्या १८ आहे.
२) सुरवातीला केवळ एकच पुराण — ‘ ब्रम्हांड पुराण ‘ अस्तित्वात होते.
३) या अठरा पुराणांच्या मागे व्यासांचा संबंध आहे.
४) या व्यासानेच ब्रम्हांड पुराणातील विषय वेगवेगळे करून प्रत्येक विषयावर स्वतंत्र अशा पुराणांची निर्मिती केली.
५) अशाप्रकारे अठरा पुराणांच्या निर्मितीच्या प्रक्रियेला पुराणांच्या विकासाची द्वितीय अवस्था मानण्यात येते,
६) प्रत्येक पुराणांच्या सुरवातीचा भाग व्यासद्वारा रचीत व प्रकाशित केला गेला.त्याला आदिपुरान म्हणतात.
७) पुराणांचे मुळ विषय हे व्यासाद्वारा निर्मित आहेत.
८) या अठरा पुराणांच्या निर्मिती नंतर व्यासांनी ते आपला शिष्य ‘ रोमहर्षण ‘ याला एकवीले.
९) रोमहर्षण द्वारा पुराणांची तृतीय आवृत्ती निर्माण केली गेली.
१०) रोमहर्षण याला सहा शिष्य होते.या सहापैकी तीन शिष्य काश्यप, सावर्णी, व वैशंपायन यांनी आपले स्वतःचे वेगवेगळे पुराणांचे संस्करण. केले.
११) यांनाच पुराणांची चतुर्थ आवृत्ती म्हणण्यात येते.
१२) वरील तीनही संस्करण तिघांच्या नावाने ओळखले जातात.
१३) भविष्य पुराणातील पुराव्यानुसार पुराणात संशोधन राजा विक्रमदित्यच्या काळात करण्यात आले.
१४) सुरवातीला पुराणात केवळ पाच विषय होते.
१) सर्ग, २) प्रती सर्ग ,३) वंश,४) मन्वंतर, आणि ५) वंशचरीत
१). सर्ग — याचा अर्थ आहे ब्रम्हांडाचि रचना.
२) प्रती सर्ग.– याचा अर्थ आहे ब्रम्हांड चे विलीनीकरण.
३) वंश – याचा अर्थ आहे जीवनाचा क्रम अर्थात वंशावळी
५) * मन्वंतर *-याचा अर्थ वेगवेगळ्या १४ मनुपासून सृष्टीचा विकास झाला, त्यांना मन्वंतर म्हणतात.
५) *वंशचरीत याचा अर्थ * – राजा महाराजांच्या अनेक पिढ्यांच्या वंशावळी चे वर्णन.
क्रमशः
प्रस्तुती : सुनीता रामटेके अमरावती