नाशिक महानगरपालिका नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत (कोविड-१९) कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर येथे कामकाजाकरीता खालिल नमुद पदांकरीता ०३ महिने कालावधीकरीता तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर भरती करणेकामी थेट मुलाखत (Walk in Interview) अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, पहिला मजला, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक खालील नमुद तारखेस दुपारी ०३.०० ते ०५.०० या वेळेत घेण्यात येतील. सर्व संबंधीत उमेदवारांनी किमान शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्यास आवश्यक त्या सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे व त्यांच्या छायांकीत प्रतिसह मुलाखत ठिकाणी उपस्थित रहावे.
अनुभवाच्या बाबतीत फक्त शासकिय, निमशासकिय स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत असणारा अनुभव ग्राह्य धरला जाईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवाराने सादर केलेल्या शैक्षणिक कागदपत्रे रुजु होतांना मुळ कागदपत्रे सोबत आणने अनिवार्य
आहे. उमेदवारांनी पासपोर्ट साईझ २ फोटो, जन्म तारखेकरीता शाळा सोडल्याचा दाखला, फोटो आयडी करीता मतदान ओळखपत्र किंवा आयडी कार्ड शैक्षणिक अहर्ता कामी शेवटच्या वर्षांची गुण पत्रिका, रजिस्ट्रेशन व नुतनीकरण प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र आवश्यक राहील.
उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे राजकिय दबाव आणल्यास नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल. जाहीरात मध्ये बदल करणे, भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, प्रक्रियेत बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार मा.
आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी राखून ठेवलेला आहे. उमेदवार हा संबंधीत पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. तसेच त्याच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
आयुक्त नाशिक महानगर पालिका, नाशिक, यांनी असे जाहिराती मध्ये कळविण्यात आले आहे
More Stories
रेल्वेत 6 हजाराहून अधिक पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता?
जून २०२५ मध्ये अर्ज करण्यासाठी टॉप ७ सरकारी नोकऱ्या, मुख्य तपशील तपासा
८५००+ रिक्त पदांसाठी CPWD भरती २०२५ ची अधिसूचना