August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग तिसरा – ५. त्याने तपश्चर्या त्यागली.

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड : भाग तिसरा –  नव प्रकाशाच्या शोधात

🌼 ५. त्याने तपश्चर्या त्यागली. 🌼

१. गौतमाची तपश्चर्या आणि आत्मपीडा उम्र स्वरूपाची होती. ही खडतर, कठोर तपश्चर्या त्याने दीर्घकाळ म्हणजे सहा वर्षापर्यंत केली.

२. सहा वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्याचा देह एवढा क्षीण झाला, एवढा दुर्बल झाला की, त्याला देहाची हालचाल करणेही कठीण झाले.

३. तरीही त्याला प्रकाशाचे दर्शन झालेच नाही. जगात दुःख आहे या समस्येने त्याचे चित्त व्यापले होते. या समस्येचे समाधान त्याला कोठेही दृष्टिपथात आढळत नव्हते.

४. त्याने आत्मसंशोधन केले. “हा काही मार्ग नव्हे, तृष्णारहित होण्याचा, ज्ञानप्राप्तीचा किंवा मुक्तीचा.

५. “काही सुखप्राप्तीसाठी कष्ट करतात, काही स्वर्गप्राप्तीसाठी कष्ट करतात. बिचारे प्राणिमात्र खोट्या आशेपायी आपले ध्येय हरवुन बसतात. सुखाच्या पाठी लागलेल्या या क्षुद्र जीवांच्या वाट्यावर शेवटी दुःखच येते.

६. “काय माझ्याबाबतीतही असेच घडले नाही ना.

७. “मी प्रयलांना दोष देणार नाही. परंतु हे प्रयत्न आधाराशिवाय आकाशात उडण्याचे प्रयत्न होते.

८. “मला असा प्रश्न पडतो की, “देहाचे उत्पीडन, देहाचे क्लेष यालाच धर्म म्हणावे काय ?”

९. “मनाची प्रेरणा, मनाची आज्ञाच देहाला कर्म करण्यास किंवा न करण्यास प्रवृत्त करते. म्हणूनच चित्त साधना हीच सर्वात योग्य आहे. विचारहीन देह हा कुत्र्यासारखा आहे.”

१०. “जर फक्त देहाचाच विचार करावयाचा असेल तर शुद्ध अन्न ग्रहण करूनही देहाची पवित्रता राखता येईल. परंतु जो कर्ता आहे त्याच्या पावित्र्याचे काय? मग या सर्वांचे प्रयोजनच काय ?.

११. “जो क्षुधेने व्याकुळ आहे. जो तृष्णेने व्याकुळ आहे. जो अति कष्टाने भागलेला आहे. क्लेषाने, पीडेने, कष्टाने ज्याने आपल्या चित्तावरील नियंत्रण गमावले आहे. जो शक्तिहीन झाला आहे
अशा माणसाला नूतन प्रकाशाचे दर्शन होणे कदापिही शक्य नाही.

१२. ज्याचे चित्त शांत नाही, तो चित्ताच्या एकाग्रतेतून साध्य करावयाच्या ध्येयाप्रति कसा पोहोचू शकतो ?

१३. “शारीरिक गरजांची नित्यपूर्ती करूनच चित्त शांती आणि चित्त संयम योग्य प्रकारे साथता येईल.

१४. त्याकाळी उरुवेला येथे सेनानी नावाचा गृहस्थ निवास करीत होता. सुजाता त्याची कन्या.

१५. सुजाताने पिपळाच्या वृक्षाला नवस केला होता. तिला पुत्र झाला तर ती दरवर्षी त्या पिंपळाच्या वृक्षाची पूजा बांधणार होती.

१६. तिची मनोकामना पूर्ण झाली. तिने आपली दासी पन्ना हिला पूजेसाठी जागा स्वच्छ करण्याच्या हेतूने वृक्षाकडे पाठविले.

१७. पत्रेला गौतम वृक्षाखाली बसलेला दिसला. तिला वाटले की वृक्षदेवच प्रत्यक्ष अवतरला आहे.

१८. सुजाताने स्वतः येऊन गौतमाला सुवर्ण पात्रातून अन्न अर्पण केले.

१९. गौतम अन्न पात्र घेऊन नदीकाठी गेला. त्याने सुप्पतिष्ठ्ठ घाटावर स्नान केले. आणि अन्न ग्रहण केले.

२०. अशा प्रकारे त्याची तपश्चर्या समाप्त झाली.

२१. गौतमाने तपश्चर्येचा, आत्मक्लेषाचा मार्ग त्यागला हे पाहून त्याच्यासंगे जे पांच परिव्राजक होते ते रुष्ट झाले आणि निराश होऊन्न गौतमाला सोडून निघून गेले.

५. त्याने तपश्चर्या त्यागली. ( समाप्त )….
( भाग ३ : नव प्रकाशाच्या शोधात समाप्त )