November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म – ४. असित ऋषीचे आगमन

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 लेखक : भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

 प्रथम खंड :  भाग पहिला  – जन्म ते प्रव्रज्या.

🔷 ४. असित ऋषीचे आगमन 🔷

१. बालकाच्या जन्मसमयी असित नावाचे महामुनी हिमालयात वास्तव्य करीत होते.

२. असितमुनीने ऐकले की, स्वर्गातील देवता बुद्ध नावाचा घोष करीत आहेत आणि त्याचा
प्रतिध्वनी आसमंतात घुमतो आहे. त्यांना असे दिसले की, स्वर्गातील देवता आनंदाने नाचत बागडत, प्रसन्नतेने आपली वस्त्रप्रावरणे झुलवीत विहार करीत आहेत. त्यांनी विचार केला की,ज्या भूमीत बुद्ध जन्मला त्या जागी जाऊन जर मी त्याचा शोध घेतला तर किती बरे होईल.

३. आपल्या अंतःचक्षूनी संपूर्ण जंबुद्वीपाचा शोध घेतल्यानंतर असितमुनींना असे दिसले की, शुद्धोदनाच्या घरी आपल्या दिव्य तेजाने चमकणाऱ्या एका बालकाने जन्म धारण केला आहे आणि या बालकाचा जन्म हेच या देवतांच्या प्रसन्नतेने उचंबळून येण्याचे कारण आहे.

४. त्यानंतर महान असितमुनी उठले. त्यांनी आपला भाचा नरदत्त यासह शुद्धोदनाच्या राजप्रासादाकडे प्रस्थान केले आणि ते राजप्रासादाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभे राहिले.

५. महान असितमुनींना असे दिसले की, शुद्धोदनाच्या राजप्रासादाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा जनसमुदाय एकत्र झाला आहे. म्हणून असित मुनी द्वारपालाजवळ जाऊन म्हणाले, “हे द्वारपाला, राजाला सूचित कर को, प्रवेशद्वारात एक तपस्वी उभा आहे.”

६. द्वारपाल राजाकडे गेला आणि हात जोडून प्रार्थनेच्या स्वरात म्हणाला, “हे राजा, एक वयोवृद्ध तपस्वी आपल्या द्वारी उभे आहेत. त्यांनी आपणाशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.”

७. राजाने असितमुनीसाठी आसन सिद्ध केले; आणि द्वारपालाला म्हटले, “त्या तपस्व्याला आत येऊ दे.” त्यानुसार द्वारपाल बाहेर येऊन असित मुनींना म्हणाला, “मुनिवर कृपया यावे.”

८. त्यानंतर असितमुनी राजा शुद्धोदनाजवळ जाऊन उभे राहिले; आणि, “राजाचा विजय असो ! राजा चिरायू होवो ! राजा न्यायाने आणि नीतीने राज्य करो।” असे आशीर्वचन दिले.

९. त्यानंतर शुद्धोदनाने आदराने असितमुनीला साष्टांग प्रणिपात केला; आणि त्यांना आसन ग्रहण करण्याची विनंती केली. मुनींनी सुखपूर्वक आसन ग्रहण केल्यानंतर शुद्धोदन म्हणाला, “हे मुनिवर, मी आपणास यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा हेतू काय ? आपल्या येण्याचे प्रयोजन काय ?”

१०. त्यानंतर असितमुनी शुद्धोदनाला म्हणाले, “हे राजा, तुला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. त्याच्या दर्शनाची अभिलाषा हे माझ्या येथे येण्यास निमित्त आहे.”

११. शुद्धोदन म्हणाला, “हे मुनिवर पुत्र निद्राधीन आहे. काय, आपण क्षणभर थांबू शकाल ?” मुनी उद्गारले, “हे राजा, अशा दिव्य विभूती फार काळ निद्राधीन असत नाहीत. अशा दिव्य विभूती स्वभावतःच सतत जागृत असतात.”

१२. त्यानंतर मुनीविषयी अनुकंपा वाटल्याने बालकाने आपण जागे असल्याचा संकेत दिला. १३. बालक जागे झाले आहे हे पाहून शुद्धोदनाने बालकाला आपल्या दोहो करांनी व्यवस्थित सांभाळले आणि मुनिवरांपुढे प्रस्तुत केले.

१४. असितमुनींनी बालकाला डोळे भरून पाहिले. त्यांना ते बालक दिव्य पुरुषाच्या ३२ लक्षणांनी युक्त आहे असे दिसले. त्याच बरोबर त्यांना त्या बालकाला दिव्य पुरुषाची ८० अनुलक्षणेही प्राप्त आहेत असे दिसले. मुनिवरांना असे दिसले की बालक शक्र किंवा ब्रह्मा यांच्यापेक्षाही दैदीप्यमान आहे. बालकाचे तेजोवलय त्यांच्यापेक्षा हजारो पटींनी अधिक प्रकाशमान आहे. त्यानंतर मुनी अमर वाणी उद्गारले, ‘हा जो पुरुष इहलोकी अवतरला आहे तो अलौकिक आहे हे सत्य आहे.’ त्यानंतर मुनिवर आपले आसन सोडून, हात जोडून उभे राहिले. त्यांनी बालकाच्या चरणी साष्टांग दण्डवत घातले. त्यांनी बालकाला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर त्यांनी बालकाला आपल्या हाती घेतले व ते ध्यानस्थ उभे राहिले.

१५. असित मुनींना सर्वपरिचित प्राचीन भविष्यवाणीची आठवण झाली. दिव्य पुरुषाच्या ३२ लक्षणांनी युक्त अशा गौतमासारख्या महापुरुषाच्या जीवनाला दोनच मार्ग असतात; तिसरा नसतोच. गृहस्थ म्हणून जीवन जगला तर तो चक्रवर्ती राजा होईल पण जर गृहत्याग करून प्रव्रज्या स्वीकारली तर तो सम्यक् सम्बुद्ध होईल.

१६. असितमुनींना दृढविश्वास होता की, हे बाळ गृहस्थ जीवन स्वीकारणार नाही.

१७. बालकाकडे पाहून मुनिवर रडू लागले. त्यांच्या नेत्रातून अश्रू गळू लागले. त्यांनी दुखाने दीर्घश्वास सोडला.
१८. मुनिवर अश्रू गाळीत आहेत, दुःखाने निश्वास सोडत आहेत हे शुद्धोदनाने पाहिले.

१९. मुनिवरांना दुःखातिरेकाने अश्रू गाळताना पाहून राजाच्या देहाचे अणुरेणू शहारले. अत्यंत व्यथित अंतःकरणाने शुद्धोदन असितमुनींना म्हणाला, ‘हे मुनिवर आपण का अश्रू गाळीत आहात ? आपण का दुःखी होत आहात ? आपल्या व्यथा वेदनांचे कारण काय ? माझ्या पुत्राचे भवितव्य तर निर्विघ्न आहे ना ?’
२०. यावर असितमुनी म्हणाले, ‘हे राजा, मी बालकासाठी दुःखी नाही. बालकाच्या भवितव्यात हे. मी माझ्याकरिता दुःखी होत आहे’ काहीही विपरीत नाही. परंतु मी माझ्याकरिता अश्रू गाळीत आहे.

२१. ‘परंतु का ?’ शुद्धोदनाने पृच्छा केली. असितमुनी म्हणाले, “मी वृद्ध आहे. माझे वय झाले आहे. हे बालक बुद्ध होणार यात शंका नाही. हे बालक सम्यक् सम्बुद्ध पदाला निश्चितच प्राप्त होणार बुद्धत्व प्राप्त झाल्यावर लोककल्याणासाठी धम्मचक्र प्रवर्तन करणार हे असे धम्मचक्र प्रवर्तन यापूर्वी कोणीही केले नाही. तो लोककल्याणाचा आपला सद्धम्म जगाला सांगणार”

२२. ” जे धम्मजीवन, जे धम्मज्ञान बुद्ध घोषित करणार आहे ते आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंत्य कल्याणकारी असेल. ते शब्द आणि अर्थ यांच्या दृष्टीने परिपूर्ण असेल ते पवित्र असेल. ते संपूर्ण असेल.”

२३. “ज्याप्रमाणे औदुंबराला कधी काळीच क्वचित जागी पुष्प येते त्याचप्रमाणे अनंत युगानंतर या भूतलावर श्रद्धेय बुद्ध अवतरतात. हे राजा, हे बालक बुद्धत्व प्राप्त करील. सम्यक् सम्बुद्ध पदाला प्राप्त होईल यात शंका नाही. हे बालक बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर अनंत प्राणिमात्रांना या दुःखमय
भवसागरातून पलीकडे घेऊन जाईल, जेथे सुख सेल, शांती असेल, समाधान असेल्”
२४. “परंतु मी बुद्धाला पाहू शकणार नाही. म. झ्ण अश्रू गाळण्याचे, माझ्या दुःखाचे, हे राजा, हेच कारण आहे. मी माझी श्रद्धासुमने या बुद्धाला अर्पण करू शकणार नाही.”

२५. त्यानंतर राजाने मुनिवर आणि त्यांचा भाचा नरदत्त यांना यथोचित भोजन व वस्त्रे दान केली; आणि मुनीभोवती प्रदक्षिणा घातली.

२६. त्यानंतर असितमुनी नरदत्ताला म्हणाले, “नरदत्त, जेव्हा तुला समजेल की बालक बुद्धत्वाला प्रा झाले तेव्हा त्याच्याकडे जा व त्याच्या धम्माला शरण जा यातच तुझे कल्याण आहे. एवढे बोलून असितगुनींनी राजाचा निरोप घेतला आणि आपल्या आश्रमाकडे प्रयाण केले.

The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म