August 6, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध आणि त्यांचा धम्म -भाग चवथा – ३. नव्या धम्माचा आविष्कार

The Buddha and His Dhamma,

📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ

प्रथम खंड : भाग चवथा – नवीन मार्गाचे दर्शन आणि बोधिलाभ

🌼 ३. नव्या धम्माचा आविष्कार 🌼

१. जेव्हा गौतम नूतन प्रकाशाच्या शोधात ध्यानधारणेत मग्न होता तेव्हा त्याच्यावर सांख्य दर्शनाचा मोठा प्रभाव होता.

२. त्याने विचार केला की या जगात दुःख आणि कष्ट या बाबी वादातीत आणि यथार्थ आहेत.

३. गौतम दुःख कसे निवारण करता येईल हे जाणून घेण्यास उत्सुक होता. परंतु सांख्य दर्शनात या समस्येचे कोणतेही निदान नव्हते. सांख्य दर्शनात या समस्येसंबंधात काहीही नव्हते.

४. म्हणून त्याने या समस्येवर, जगातील दुःखाचे, कष्टाचे कसे निवारण होईल या समस्येवर त्याने आपले चित्त एकाय केले.

५. स्वाभाविकपणे प्रथम त्याने स्वतःलाच असा प्रश्न केला की, “मनुष्यमात्राला दुःख भोगावे लागते. कष्ट भोगावे लागतात. तेव्हा या दुःखाची, कष्टाची कारणे कोणती ?”

६. त्याचा दुसरा प्रश्न होता, “या दुःखाचे, कष्टाचे निवारण कसे होईल ?”

७. या दोन्ही प्रश्नांचे त्याला योग्य समाधान गवसले. त्याला “सम्यक् सम्बोधी” म्हणून संबोधिले जाते.

८. याच कारणास्तव तो पिंपळ वृक्ष “बोधिवृक्ष” म्हणून सर्वपरिचित आहे..

३. नव्या धम्माचा आविष्कार ( समाप्त )….