बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग दुसरा – कायमचा गृहत्याग.
🌼 ३. गौतमाचे बिंबिसाराला उत्तर ( पूर्वार्ध ) 🌼
१. इंद्रासारख्या स्पष्ट आणि दृढ शब्दात मगध सम्राट जे बोलला ते ऐकून राजपुत्र आपल्या संकल्पापासून जराही विचलित झाला नाही. तो पर्वतासारखा अचल राहिला.
२. मगध सम्राटाने अशा प्रकारे संबोधित केल्यानंतर गौतम अविचल, आत्मसंयमी, स्नेहवदनाने दृढ शब्दात उत्तरला,
३. “हे राजा, तू जे काही बोललास ते तुला शोभेसेच आहे. यापेक्षा वेगळे असे काही तू बोलावे ही अपेक्षाही नाही. हे राजा, सिंह ज्याचे चिन्ह आहे अशा श्रेष्ठ कुळात तुझा जन्म झाला आहे. तू आपल्या मित्रांचा शुभचिंतक आहेस. म्हणून माझ्यासारख्या मित्राच्याबाबतीत तू अशा प्रकारे विचार करावा आणि अशा कृतीला प्रवृत्त व्हावेस हे स्वाभाविक आहे.
४. “जे शीलवान नाहीत, ज्यांचे विचार अभद्र आहेत त्यांची वंशपरंपरागत मैत्रीही काळाच्या
ओघात लोप पावते. जे शीलवान आहेत तेच आपल्या विचाराने आणि कृतीने आपली वंशपरंपरागत मैत्री टिकवून ठेवतात, वृद्धिंगत करतात.
५. “वैभवाच्या काळात धनधान्य संपन्नाचा कोण मित्र होऊ इच्छित नाही? परंतु प्रतिकूल परिस्थितीतही मैत्रीचा त्याग न करता जे मित्राप्रति आपले कर्तव्य पार पाडतात त्यांनाच मी खरे मित्र मानतो.
६. “ज्यांनी या जगात धनसंपत्ती संपादिली आहे, जे आपल्या धनसंपत्तीचा मित्रांसाठी आणि धर्मासाठी उपयोग करतात त्यांचीच धनसंपदा सर्वार्थाने सार्थक आहे. अशी धनसंपदा विनाश पावली तरीही तिच्या विनाशाचे दुःख होत नाही.
७. “हे राजा तू माझ्याविषयी जे काही सुचविले आहेस ते तुझ्या मैत्री आणि औदार्याचे प्रतीकच आहे. मी सुद्धा मैत्रीला मैत्रीनेच प्रतिसाद देण्याचा प्रयास करीन. माझ्या संभाषणात एकही शब्द अन्यथा असणार नाही.
८. “जेवढे मला विषय सुखाचे भय वाटते तेवढे मला विषारी सापांचेही भय वाटत नाही. मला आकाशातून कोसळणाऱ्या विद्युल्लतेचेही भय नाही. वायूसंगे प्रज्वलित वडवानलाचेही मला भय नाही.
९. “हे अस्थिर विषय भोगविलास आपल्या सुख समृद्धीचा विनाश करणारे आहेत. विषयभोगविलास हे मायेसारखे जगात व्याप्त आहेत. त्यांची अपेक्षाही चित्त चंचल करण्यास पुरेशी आहे. जर त्यांनी चित्ताचा ताबाच घेतला तर मग काही उरतच नाही.
१०. “या विषयसुखाचे बळी दिव्यलोकीही सुख प्राप्त करू शकत नाही. मर्त्यलोकाची तर कथाच काय ? ज्या प्रमाणे वायू आणि इंधनाच्या संयोगाने अग्नी कधीही शमत नाही त्याचप्रमाणे विषयाची तृष्णा कधीच शमत नाही.
११. “विषय सुखासारखी या जगात दुसरी विपत्ती नाही. विषयसुख मायेसमान आहे. मायामोहाने ग्रस्त होऊन लोक विषयसुखाचे दास होतात. परंतु सत्याची जाणीव झाली तर मात्र विषय सुखाचे भय वाटते. म्हणून कोणता सुज्ञ माणूस विपयसुखाची कामना करील ?
१२. “सागरावगुंठित पृथ्वी पादाक्रांत केल्यावरही राजे सागरापलीकडे विजयाची कामना करतात. सागराला कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी सागर अतृप्त राहतो तद्वतच मनुष्यमात्राची विषयसुखाची तृष्णा कधीच शमत नाही.
१३. “स्वर्गातून सुवर्णाची वर्षा झाली, त्याने सर्वखंड पृथ्वी पादाक्रांत केली, त्याला शक्राचे अर्धे राज्य मिळाले तरी मान्धात्याची विषय सुखाची तृष्णा शमलीच नाही.
१४. “जेव्हा वृत्राच्या भयाने इंद्र लपून राहिला तेव्हा त्याने स्वर्गाचे राज्य भोगले. अहंकाराच्या आहारी जाऊन त्याने ऋषींना आपल्या पालखीचे वाहक बनविले तरीही नहुषाची तृष्णा अतृप्तच राहिली.
१५. “ज्यांनी वल्कले धारण केली, कंदमुळे आणि जल भक्षण करूनच आपली उपजीविका चालविली. ज्यांच्या सापासारख्या लांब लांब जटा होत्या, ज्यांनी दुसऱ्या पुरुषार्थासाठी स्वतःला समर्पित केले त्यांच्यावरही विषयसुखाने विजय संपादन केला. तेव्हा अशा शत्रूसारख्या विपयसुखाचे कोण स्वागत करेल ?
१६. “विषयासक्त होऊन विषयसुखांच्या आहारी गेलेल्यांच्या दुःखाची जाणीव झाल्यावर आत्मसंयमी माणसांसाठी हेच योग्य आहे की त्यांनी विषयसुखापासून परावृत्त व्हावे.
१७. विषयसुखात लिप्त असणा-याला आपल्या वासनांची तृप्तो होत आहे असे वाटते तेव्हा त्याच्यावर आपत्ती कोसळणार हे निश्क्षित विषयवासनांची तृप्ती माणसाला त्यांचा दास बनविते. तो त्यांच्या आहारी जातो. वासनांच्या तृप्तीसाठी जे करू नये ते तो करतो आणि जे करणे योग्य आहे ते तो करीत नाही वासनेचा बळी ठरलेल्या अशा माणसाचा दुःखद अंत होतो.
१८. “भोगविलास प्रयत्नपूर्वक भोगले जातात ते सुरक्षित राहावेत असेही प्रयास केले जातात पण व्यर्च हे भोगविलास आपल्याशी कपट करतात ते जेथून आले असतात तेथेच परत जातात हे भोगविलास तात्पुरते उसने घेतल्यासारखे आपल्या वाट्याला येतात म्हणून जो ऑत्मसंयमी आहे, सुज्ञ आहे तो या भोगविलासांनी आनंदी कसा होईल ?
१९. “भोगविलास गवताच्या पेटत्या मशालीसारखे आहेत. जेव्हा मनुष्य त्यांची कामना करतो किंवा त्यांना भोगतो तेव्हा त्याने त्याची तृष्णा शमत नाही तर ती वृद्धिंगत होते. म्हणून आत्मसंयमी माणूस या भोगविलासाने कसा समाधान पावेल ?
२०. विषयसुख हे वाटेत फेकलेल्या तिरस्कृत अशा मांसाच्या तुकड्यासारखे आहे. त्याच्या स्पशनि राजा काय आणि रंक काय दोघेही दुःखीच होणार अशा विषयसुखात आत्मसंयमी माणूस कसा समाधान पावेल ?
२१. “ही विषयवासना इंद्रियांचा नाश करणारी आहे. जो यात रममाण होईल त्याच्यावर विपत्ती येणारच म्हणून आत्मसंयमी माणूस विषय वासनेत कसे समाधान पावेल ?
२२. “या विषय वासना क्रूर सापासारख्या आहेत. ज्याच्या हृदयाला विषयवासनांचा दंश झाला आहे असा आत्मसंयमी माणूसही विनाशास प्राप्त होतो. तो सुखाला पारखा होतो. म्हणून आत्मसंयमी माणूस विषयवासनेत कसे समाधान पावेल ?
२३. “विषयसुख अस्थींच्या सापळ्यासारखे आहे. ज्याप्रमाणे क्षुधेने व्याकुळ श्वानाची हाडे चघळून क्षुधा तृप्त होत नाही, त्याचप्रमाणे विषयसुख भोगूनही माणसाची तृप्ती होत नाही. अशा विषयसुखात आत्मसंयमी माणूस कसे समाधान पावेल ?
२४. “ज्याचा विवेक वासनेने आंधळा झाला आहे, जो वासनेचा दास होऊन्न सतत वासना तृप्तीचीच अपेक्षा करतो तो क्षुद्र जीव जिवंतपणीच मृत्यूच्या यातना भोगण्याच्या लायकीचा आहे.
२५. गीतांनी मोहित होऊन मृग विनाशाकडे खेचले जातात. प्रकाशाने आकर्षित होऊन कीटक अग्नी भक्षण करतात. मांसाच्या गोळ्याच्या लोभापायी मासे गळाला लागतात. त्याचप्रमाणे विषयसुख शेवटी दुःखाचे कारण ठरते.
२६. “विषयसुख म्हणजे आनंद असा सर्वसामान्य समज आहे. जर याची समीक्षा केली तर कोणतेही विषयसुख भोगण्यात तथ्य नाही असे दिसेल. सुंदर वस्त्रप्रावरणे आणि इतर वस्तू यांना दुःख निवारण्याचे साधन म्हणूनच उपयोगिले पाहिजे.
२७. तृष्णा तृप्तीसाठी जल आवश्यक आहे. क्षुधाशांतीसाठी अन्नाची गरज आहे. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षणासाठी घर आवश्यक आहे. लज्जा रक्षणासाठी तसेच शीत संरक्षणासाठी वस्त्रप्रावरणे हवीत.
२८. “तसेच निद्रेसाठी शय्या, प्रवासाचा शीण होऊ नये म्हणून वाहन, उभे राहण्याचा शीण घालविण्यासाठी आसन आणि स्वास्थ्य, शक्ती आणि स्वच्छतेसाठी स्नान आवश्यक आहे.
२९. “बाह्यवस्तू दुःख निवारणाची साधने आहेत. या वस्तू स्वतःच आनंदाचे, सुखाचे स्रोत नाहीत. कोणता सुज्ञ माणूस या दुःखनिवारक साधनांना सुखाचे स्रोत म्हणून भोगण्याचा विचार करील ?
३०. “ज्वराने दग्ध माणसाला शीतसाधने सुखदायी वाटतात. वस्तुतः तो या साधनांनी आपले दुश्व निवारण करतो. परंतु तो अज्ञानवश त्यांनाच सुखाचे स्रोत मानतो.
३९. “प्रथमदर्शनी जी स्थिती सुखदायी वाटते तीच स्थिती शेवटी दुःखाचे कारण ठरते. सर्व प्रकारच्या वासना अयोग्य आहेत. मी त्यांना सुखाचे स्रोत म्हणून संबोधू शकत नाही.
३२. “भारी वस्त्रप्रावरणे आणि सुगंधी धूप शीतकाली सुखदायी वाटतात तर पीष्मकाळी तापदायी चाटतात. चंद्रकिरणे आणि चंदनाचा लेप वाटतो. भीष्मकाळी सुखदायी तर शीतकाळी क्लेशकारक
३३. “जगात पदोपदी इंद्राचा प्रत्यय येतो. जसे लाभ-हानी इत्यादी. हे द्वंद्व प्रत्येक वस्तूशी निगडित आहे. म्हणूनच या पृथ्वीतलावर कोणीही नित्य सुखी नाही तर नित्य दुःखीही नाही.
३४. “मी हे पाहतो की, सुख आणि दुःख एक दुसऱ्याशी निगडित आहे. मला राजपद आणि दास्य यांचे संबंधही असेच वाटतात. म्हणूनच राजा नेहमी आनंदी नसतो तर दास नेहमी दुःखीही नसतो.
३५. “राजा होण्याने अधिक उत्तरदायित्व शिरावर येते. राजाची दुःखेही मोठीच असतात. राजाचे जीवन खुंटीसारखे आहे. तो इतरांची दुःखे आमंत्रित करीत असतो.
३६. “जो राजा आपल्या राज्ययंत्रणेवर विश्वासून असतो त्याच्यासारखा दुर्दैवी राजा नाही. राज्ययंत्रणेला कपटकारस्थाने प्रिय असतात. राज्य राजाला एक ना एक दिवस सोडून जाणारच असते. पण जर राजाने राज्ययंत्रणेवर विश्वास ठेवला नाही तर अशा भित्र्या राजाला राजा होण्याचे काय सुख ?
३७. “संपूर्ण पृथ्वी जिंकल्यावरही राजा एका नगरातच वास्तव्य करतो. नव्हे त्या नगरातील एका राजप्रासादातच वास्तव्य करतो. अशा स्थितीत राज्य प्राप्त करणे म्हणजे केवळ दुसऱ्याकरिताच कष्ट करणे नव्हे काय ?
३८. “चैभवात राहूनही राजाला वस्त्राची एक जोडीच हवी असते. क्षुधा शमविण्यासाठी त्याला आवश्यक तेवढ्या अन्नाशिवाय आणखी काय हवे असते ? त्याला निद्रेसाठी एकच शय्या पुरे आहे. त्याला बसण्यासाठी एकच आसन हवे असते. इतर वस्तू ज्या राजाला इतरापासून वेगळे करतात. त्या त्याचा मात्र अहंकार जपण्यासाठी असतात.
३९. “या सर्व वस्तू संतोषासाठी आवश्यक असतील तर मी राज्याशिवायही संतुष्ट आहे. एकदा संतोष प्राप्त झाल्यावर अहंकार जपणाऱ्या इतरांपासून मला वेगळे करणाऱ्या इतर वस्तूंची मला आवश्यकता नाही.
४०. “ज्याला मंगलमय सुखाचा मार्ग गवसला आहे तो विषयभोगाच्या मोहात पडण्याचे काहीही कारण नाही. आपल्या पोषित मैत्रीची आठवण ठेवून मी आपणास पुन्हा विचारतो की, विषयसुखात खरेच काही तथ्य आहे काय ?
४१. “मी क्रोधित होऊन गृहत्याग केला नाही. शत्रूच्या बाणांनी माझा मुकुट हिरावला गेला म्हणूनही मी गृहत्याग केला नाही. काही मोठी अपेक्षा ठेवूनही मी गृहत्याग केला नाही म्हणून मी तुमचा प्रस्ताव नाकारतो.
४२. “भयानक क्रुद्ध सापापासून एकदा बचावल्यानंतर पुन्हा त्या सापाची अपेक्षा करावी, दोन्हीकडून जळत असलेल्या गवताच्या मशालीचा त्याग केल्यानंतर पुन्हा ती मशाल हाती घ्यावी त्याचप्रमाणे एकदा विषय सुखापासून विरक्त झाल्यानंतर पुन्हा विषय सुखाची अपेक्षा करावी.
४३. “डोळस असूनही अंधाची ईर्ष्या करणारा, मुक्त असूनही दासाची ईर्ष्या करणारा, धनधान्यसंपन्न असूनही अकिंचनाची ईर्ष्या करणारा, स्वस्थचित्त असूनही दुर्बलमनस्काची ईर्ष्या करणाराच विषयासक्त माणसाची ईर्षा करू शकतो असे मला वाटते.
४४. “या जगी तोच परम सुखी आहे, ज्याला परम शांती लाभली आहे, ज्याच्या सर्व दुःखाचा अंत झाला आहे, जो भिक्षेवर जगतो, त्याविषयी माझ्या मित्रा, दया दाखविण्याचे, त्याला दयेला पात्र
मानण्याचे काहीही कारण नाहा.
४५. “अमाप संपत्ती असूनही ज्याचा लोभ शमला नाही तो दयेला पात्र आहे. परम सुख शांतीची ज्याला अनुभूती झाली नाही तो दयेला पात्र आहे. भविष्यात ज्याच्या वाट्याला दुःखच येणार आहेत तो दयेला पात्र आहे.
४६. “आपण माझ्याप्रति जे बोलला ते आपले शील, आपले कूळ आणि आपली जीवनचर्या याला अनुकूल आहे. माझा संकल्प माझे शील, माझे कूळ आणि माझी जीवनचर्या याला अनुकूल आहे.
More Stories
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग पाचवा – १. बुद्ध आणि वैदिक ऋषी.
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग चवथा – ४. बोधिसत्व असलेले गौतम सम्यक् सम्बोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले.
बुद्ध आणि त्यांचा धम्म -भाग चवथा – ३. नव्या धम्माचा आविष्कार