December 24, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

भगवान बुद्धांच्या धम्माच्या प्रचारासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. – भन्ते बूनली

नागपूर : 17 डिसेंबर 151 रोजी इंडो एशियन मेटा फाउंडेशन, इंडिया आणि अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध प्रतिमा वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी पूज्य भिक्षू बूनली, भन्ते अश्वमेध, भन्ते रेवत, भन्ते विनाचार्य नवी दिल्ली, थायलंडचे माजी खा. जोगेंद्र कवडे, शिक्षा महर्षी सुरेश गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आदिलाबाद, हिंगोली, वाशीम, कोल्हापूर, कुशीनगर (उ.प्र.), गडचिरोली, भंडारा, गोंदिया, मौदा, सावनेर, वाडी आदी भागातील बुद्ध विहारांना भगवान बुद्धांच्या मूर्ती दान करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन मुकेश बागडे यांनी तर आभार प्रदर्शन सत्यजित जानराव यांनी केले. प्रास्ताविक नितीन गजभिये यांनी केले.

भन्ते बूनली यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तरुण पिढीसाठी प्रेरणादायी विचार व्यक्त केले आणि भगवान बुद्धाच्या धम्माचा प्रसार करण्याचे आवाहन केले. यासाठी विविध राज्यातील नामवंत कार्यकर्त्यांना आदरणीय भदंत बूनली यांच्या हस्ते धम्मदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर, उस्मानाबाद, बार्शी, बीड, लातूर, नांदेड, वाशीम, कोल्हापूर, नागपूर, आर्वी, अमरावती, अकोला, सौसर आदी भागातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्मिता वाकडे, दिनेश शेंडे, स्नेहल नितीन गजभिये, राजू भेलावे, मनोज मेश्राम, मनोज बैतवार, रमेश गजभिये, सक्षम गजभिये, बॉबी गजभिये, प्रवीण गजभिये, सागर हुमणे आदींनी अथक परिश्रम घेतले.

*पूज्य भदंत यांच्या प्रमुख उपस्थितीत १० फूट उंचीची बुद्ध मूर्ती त्यांच्या हातांनी बांधली, विशेष म्हणजे त्यांनी एका दिवसात ही मूर्ती तयार केली.