February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सुगत बुद्धविहार इगतपुरी येथे वंदनेचा व धम्म संस्कार कार्यक्रम संपन्न

सुगत बुद्धविहार इगतपुरी येथे वंदनेचा व धम्म संस्कार कार्यक्रम आनंददायी वातावरणात संपन्न झाला. भन्तेजींनी धम्मदेसना दिली.आयु.संजय थोरात सरांनी “प्रत्येक बौद्ध नागरिकाने दर रविवारी बुद्धविहारात येणे का आवश्यक आहे” याबाबत उपस्थितांना माहिती सांगितली.

आजच्या कार्यक्रमात धम्मगिरी येथील भारतीय व काही विदेशिय नागरिकांनीही सहभाग नोंदविला.समता सैनिक अमोलभाऊ शेजवळ यांनी विद्यार्थ्यांना विविध एरियातून घेऊन येण्याची व घरी सोडविण्याची जबाबदारी पार पाडली.

प्रत्येक बोद्ध बांधवानी बुद्ध विहारात आले पाहिजे मुलांना धम्म आचरण धम्म समजला पाहिजे त्यांचे जीवन धम्ममय झाले पाहिजे, धम्म समजला कि शील संपन्न माणूस तयार होतो त्यास समानतेची प्रेमाची आदराची मनुष्या प्रति भावना निर्माण होते या करीत सर्वानी बुद्ध विहारात आले पाहिजे या संकल्पाने इगतपुरी येथे धम्म कार्य पुन्हा जोमाने सुरु झाले आहे.