नाशिक शहरात सातपूर येथील विश्वशांती बुद्ध विहार म्हाडा कॉलनी अंबड लिंक रोड सातपूर येथे दिनांक ०८/१२/२०२२ ते १८/१२/२०२२ पर्यंत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नाशिक शहर शाखा यांच्या वतीने व नाशिक जिल्हा अध्यक्ष सन्माननीय के.के. बच्छाव गुरुजी आणि नाशिक शहर अध्यक्ष आयु. गुणवंत एस.वाघ गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय कार्यकारणीचे संघटक आदरणीय समाजभूषण मोहनभाऊ अढांगळे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष (संस्कार विभाग) आयु बबन काळे गुरुजी. नाशिक जिल्हा उपाध्यक्ष (पर्यटन विभाग) आयु बाळासाहेब शिरसाठ गुरुजी,नाशिक जिल्हा अतिरिक्त महासचिव पी. डी. खरे नाशिक जिल्हा महासचिव आयु संजय भरीत गुरुजी, नाशिक जिल्हा कार्यकारणी सदस्य आयु. सुनील वाघमारे मंदाकिनीताई दणी,नाशिक तालुका अध्यक्ष आयु.आशोक गांगुर्डे गुरुजी, नाशिक तालुका महासचिव आयु.सोमनाथ शार्दुल गुरुजी, नाशिक शहर उपाध्यक्षा (महिला विभाग) संघमित्राताई गांगुर्डे, नाशिक महानगर महासचिव संदेश पगारे गुरुजी,नंदू काळे गुरुजी तसेच वार्ड शाखा अध्यक्ष रूपालीताई भालेराव,वार्ड शाखा महासचिव मगर ताई, इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत आणि असंख्य महिलांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झालेली असून दररोज केंद्रीय शिक्षकांमार्फत प्रशिक्षणार्थी महिलांना धम्म संस्कारांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
महिला धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर- नाशिक

More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा