२६ नोव्हेंबर संविधान दिनी सोलापूर येथील *अस्थीविहार-प्रेरणा भूमी* आणि *ऐतिहासिक पंचाची चावडी* येथे अभिवादन करण्याचे भाग्य लाभले 💐💐
या अस्थिविहारात बाबासाहेबांच्या अस्थि व जीवनातील मुख्य घटना-घडामोडी शिल्पांच्या स्वरूपात मांडण्यात आल्या.
1) *प्रेरणाभूमी अस्थिविहार* :- प्रेरणाभूमी’ म्हणजेच डॉ. बाबासाहेब यांचे अस्थीकलश असलेली भूमी होय. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त तीनच शहरांमध्ये डॉ. बाबासाहेब यांच्या अस्थींच दर्शन प्राप्त होते. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाणनंतर त्यांच्या अस्थी या मुंबईतील चैत्यभूमी, नागपूर येथील दीक्षाभूमी आणि सोलापुरातील प्रेरणाभूमीत ठेवलेल्या आहेत.
समाजाला आदराचे स्थान निर्माण व्हावे म्हणून अस्थि विहार उभारण्याची संकल्पना पुढे आली. अस्थि विहारात चांदीचा कलशात बाबासाहेबांच्या अस्थी ठेवण्यात आल्या आहेत.
2) *ऐतिहासिक पंचाची चावडी* :- 26 व 27 नोव्हेंबर 1927 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली देशातील दुसरी महार वतनदार परिषद या ऐतिहासिक अशा पंचाची चावडी येथे झाली होती.
विकास खरात🙇🏻♂️
🙏🏻जय भिम🙏🏻
*
More Stories
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा संपन्न झाला
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.