February 5, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

वर्षावास प्रारंभ – भारतीय बौद्ध महासभा शाखा-दिंडोरी तालुक्याच्या वतीने, जऊळके दिंडोरी

रविवार, दिनांक २५ जुलै २०२१ – वर्षावास प्रारंभ

भारतीय बौद्ध महासभा शाखा-दिंडोरी तालुक्याच्या वतीने, जऊळके दिंडोरी येथे वर्षावास प्रवचन मालिकेचे उदघाटन करण्यात आले.

तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन करून. सामूहिक वंदना घेण्यात आली.

वर्षावास प्रवचन मालिकेचे उदघाटन दिंडोरी तालूका सरचिटणीस- रितेश गांगुर्डे व संस्कार- सचिव जयेश मोरे, मार्तंड आहिरे (श्रामनेर कळवण), सागर गांगुर्डे (श्रामनेर), तेजस संसारे (श्रामनेर लासलगाव) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले.

प्रतिमा पूजन झाल्या नंतर दिंडोरी तालूका सरचिटणीस रितेश गांगुर्डे यांनी गुरू पोर्णिमा व वर्षावासाचे महत्व समजावून सांगितले. संस्कार सचिव जयेश मोरे यांनी प्रत्येक धम्म बांधवाने वर्षावास काळात नियमित *बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचून धम्म ग्रहण करावा असे सांगितले.

कार्यक्रमासाठी प्रवीण ढेंगळे, पंकज गांगुर्डे,योगेश गांगुर्डे, सत्यम गांगुर्डे,कुसूम सुभाष गांगुर्डे, नम्रता योगेश गांगुर्डे, आश्विनी निलेश गांगुर्डे, प्रणय जगताप,(प्रबुद्ध, सम्राट, निलेश, सार्थक, अनुराग, श्रेयस, संघर्ष, अक्षरा, त्रिशा, राजरत्न, साक्षी, कावेरी, सानिका, विशाखा) इ. धम्म उपासक, उपसिका, बाल बालिके उपस्थित होते.