August 3, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

वर्षावास म्हणजे काय ?

☔ वर्षावास म्हणजे काय ? या काळात आपण काय करायला हवे ? थोडक्यात जाणून घ्या

🌸🌷🌸🌷🌸🌷🌸

🗓️ (आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा) वर्षावासास सुरुवात होईल. तत्पूर्वी हा वर्षावास काय असतो. त्याचे महत्व काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊ…

🌷 वर्षावास = वर्षा + वास
🔅 वर्षा – पावसाळा
🔅 वास – वास्तव्य

🧘‍♂️ बौद्ध भिक्खु पावसाळ्यातील तीन महिने बाहेर धम्माचा प्रचार न करता एकाच ठिकाणी राहून त्याच प्रदेशात (गावात) धम्मप्रचार करतात. यालाच वर्षावास असे म्हणतात.

💁‍♂️ पुढील कारणांमुळे वर्षावास राबवण्यासाठी बुद्धांनी संघाला दिले होते आदेश

🌾 शेतकऱ्यांचे नुकसान

⭕ पावसाळ्यात शेतकरी आपल्या शेतात धान्याची पेरणी करत असतो हे आपना सर्वाना माहित आहे.

⭕ हि पेरणी प्रमुख्याने जून महिन्याच्या शेवटी करतात व जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात ते पेरलेल्या धान्याचे अंकुर फुलू लागतात .

⭕ अश्यावेळी भिक्खू संघ मोठया प्रमाणात प्रचारासाठी बाहेर जाणार म्हटल्यावर त्यांना त्या शेतकऱ्याच्या शेतातून जावे लागे, त्यामुळे त्या पिकाचे खूप मोठे नुकसान होत असे.

⭕ काही शेतकरी बुद्धाच्या संघावर नाराज होऊ लागले. हि शेत नुकसानाची माहिती बुद्धाला समजली होती.

⭕ म्हणून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बुद्धाने भिक्खू संघाला आदेश दिला कि तुमी पावसाळ्यातील तीन महिने एकाच ठिकाणी वास्तव्य करा.

🗣️ विरोधकांची टीका

⭕ बुद्धाचे विरोधक बुद्धावर व संघावर टीका करू लागले कि अहिंसेची शिकवण देणार बुद्ध व त्याच संघ हिंसेच्या मागे लाग असंख्य लहान मोठे पावसात जन्मास येणारे प्राणी, कीटक, वगैरे मरण पावतात, व हे पाप हे बुद्ध व संघ करीत आहे असा प्रचार ते विरोधक करू लागले*

🤒 संघाचे आरोग्य

⭕ पावसात प्रवास व धम्मप्रसार करण्यात अनेक संघाला खूप त्रास होत असे, चालण्यास अयोग्य मार्ग वातावरणातील बदल, मुसळधार पाऊस यामुळे भिक्खूचे अंग भिजून ते आजारी पडत असत. अश्या अनेक कारणामुळे बुद्धाने संघास वर्षावास करण्याचा आदेश दिला.

🛖 तेव्हापासून भारतात व नंतर प्रचलित बौद्ध देशांमध्ये वर्षावासाची सुरवात झाली, व ती आजतागायत टिकून आहे.

☝️ तथागतांनी भिक्षूंकडून ह्या समस्या ऐकून घेऊन याचा उपाय म्हणून पावसाळ्यात (आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा) एका ठिकाणी तीन महिने वास्तव्य करण्याचा नियम भिक्षूसंघास घालून दिला. त्याला वर्षावास असे म्हणतात.

🤔 वर्षावासात आपण काय केले पाहिजे ?

▪️ सकाळी लवकर उठणे.
▪️ विपश्यना करणे.
▪️ बुद्ध पूजा करणे व वंदना बोलणे.
▪️ दिवसा न झोपणे.
▪️ सायंकाळी सुद्धा बुद्धपूजा करणे.
▪️ सायंकाळी हलके जेवण करणे.
▪️ रात्री झोपताना स्वतःचे आत्मपरीक्षण करणे.
▪️ उपासकाने पंचशीलाचे व जमलेतर अष्टशिलाचे काटेकोर पालन करणे. (याकाळात सवय झाली तर हळूहळू आपल्याला त्यानुसार वागण्याची सवय होते.)
▪️ या काळात बौद्ध भिक्षूंना भोजनदानास आमंत्रित करणे.
▪️ सातत्याने बुद्धविहारात जाणे.
▪️ आपापसात धम्मावर चर्चा करणे.
▪️ बाबासाहेब लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन करून इतरांना समजावून सांगणे.

📍 वर्षावास हा अत्यंत महत्वाचा काळ आहे. याचा सदुपयोग करून स्वतः व इतरांपर्यंत बुद्धाच्या धम्माचा अधिकाधिक प्रचार करावा. व प्रत्येकाने सजीवाविषयी करुणा वृद्धींगत करावी.

🌷🌸🌷🌸🌷🌸🌷

https://www.facebook.com/photo/?fbid=2064631523678013&set=a.107019886105863