March 3, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

“वैशाख दिपोत्सव जुहू चौपाटी नाही तर चैत्यभूमी येथे होणार”

वैशाख दिपोत्सव बुद्ध जयंती २०२६ निमित्त पुज्य भिक्खुसंघा सोबत मा. भीमराव आंबेडकर यांची धम्म बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर मुंबई येथे यशस्वी संपन्न झाली.
मुंबईत प्रथमच भव्य स्वरूपात समुद्र किनारी एक लाख दिव्यांचा वैशाख महोत्सव शुक्रवार दिनांक १ मे २०२६ रोजी होणार आहे. देश- विदेशातील जवळ-जवळ एक हजार बौद्ध भिक्खु आणि एक लाख अनुयायी आपला प्रत्येकाचा दिवा रात्रो १२ वाजता प्रज्वलीत करून सकाळी ५:०० वा. पर्यंत भिक्खुसंघाची सुत्र वदन धम्म साधना होईल. वरील भिक्खुसंघाच्या या ऐतिहासिक धम्म संकल्पनेस मा. भीमराव आंबेडकर साहेबांनी समजून घेतले आणि त्यांना क्षनाचाही विलंब न करता एक हजार समता सैनिक दल भिक्खु संघासोबत कार्य करतील असे जाहीर केले.
पुढे बोलतांना साहेबांनी भिक्खुसंघास आग्रह केला की, “जूहू चौपाटी येथे कार्यक्रम करण्यापेक्षा आपण वरील दिपोत्सव संकल्प चैत्यभूमी येथे सुमुद्र किनारी साजरा करा आम्ही पाहिजे ती सर्व मदत करू” भिक्खु संघाने लगेचच तीन वेळा साधू, साधू, साधू बोलून मा. भीमराव आंबेडकर साहेबांच्या विनंतीस अनुमोदन देवून स्विकार केला.
आपलाही एक दिवा ! चला येत्या शनिवारी ७ मार्च २०२६ रोजी मा. भीमाराव आंबेडकर साहेबांच्या हस्ते चैत्यभूमी येथे सायंकाळी ४:०० वा. बुद्ध जयंती वैशाख दिपोत्सव कार्यकमाचा लोगो भिक्खु संघाच्या उपस्थितीत प्रकाशीत करण्यात येणार आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार व्हा.
सदर धम्म बैठकीस उपस्थित भिक्खुसंघ
१) पूज्य भदन्त के. आर लामा,
२)पूज्य भदन्त शांतिरत्न
३ ) पूज्य भदन्त मैत्रेयघोष आयुपाल
४) पूज्य भदन्त आर. आनंद
५) पूज्य भदन्त शीलबोधी
६) पूज्य भदन्त कश्यप
७) पूज्य भदन्त पद्मपानी
८ ) पूज्य भदन्त करुणासागर
भिक्खु संघ