राष्ट्रीय परीक्षण एजन्सीने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, यूजीसी नेट परीक्षा अर्हता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नेट परीक्षेसाठी 30 सप्टेंबर पासून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील.
विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या वतीने प्राध्यापक होण्यासाठी बंधनकारक असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट ) अर्थात यूजीसी नेट-२०२३ ही परीक्षा देशभरातील ८२ विषयांत घेण्यात येणार आहे. त्यासाठी २८ ऑक्टोबरपर्यंत उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतील. त्यानंतर ६ डिसेंबरपासून परीक्षा सुरू होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय परीक्षण एजन्सी (एनटीए) ने दिली आहे.
त्यासाठी ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यावरच विद्यार्थ्यांना २९ ऑक्टोबर रात्री ११.५० वाजेपर्यंत परीक्षा शुल्क भरता येईल. परीक्षा शुल्क ११५० सर्वसाधारण प्रवर्ग ६०० इडब्ल्यूडीएस, ओबीसी ३२५ एससी, एसटी आणि तृतीयपंथी असे असेल. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एनटीएद्वारे परीक्षा केंद्रांची घोषणा केली जाईल. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र हे डिसेंबरमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ते संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात येईल. दरम्यान, उत्तर सूची आणि निकालाची तारीख अद्याप जाहीर झाली नसून ती नंतर जाहीर केली जाईल.
३१ ऑक्टोबरला केलेल्या अर्जांमध्ये दुरुस्ती आणि संशोधन करण्यासाठी संधी उपलब्ध होईल. अंतिम अर्जात पुन्हा दुरुस्तीची संधी राहणार नाही. दरम्यान, ६ ते २२ डिसेंबरपर्यंत परीक्षा घेतली जाईल.
More Stories
वडील-भावाकडे ‘जातवैधता’ असताना इतर कागदपत्रांची गरज नाही
RTE News 2024 : आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना शासकीय नसेल तर खासगी शाळांना प्राधान्य
1 जुलैपासून आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायद्याच्या जागी भारतातील तीन नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत.