१३ जूनपासून परीक्षा, अर्ज नोंदणी सुरू
मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) – देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप अॅण्ड असिस्टंट प्रोफेसर या पदांच्या भरतीसाठी जूनमध्ये घेण्यात येणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) जाहीर केले आहे. १३ ते २२ जूनदरम्यान ही परीक्षा होणार असून परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ३१ मे सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
विविध अभ्यासक्रमांच्या एकूण ८३ विषयांची ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. http://ugcnet.nta.nic.in/ या वेबसाईटवरून परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. एका विद्यार्थ्याला एकच परीक्षा अर्ज भरायचा असून एकापेक्षा जास्त अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याचा इशारा एनटीएने दिला आहे. परीक्षेसंदर्भात काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी http://ugcnet.nta.nic.in/ या वेबसाईटवर किंवा ०११- ४०७५९००० किंवा ०११-६९२२७७०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एनटीएने केले आहे.
असे आहे वेळापत्रक
■ ऑनलाइन परीक्षा अर्ज करणे – ३१ मे, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
■ परीक्षा शुल्क भरणे पर्यंत – १ जून, रात्री ११.५०
■ परीक्षा अर्जातील चुका दुरुस्ती – २ ते ३ जून, रात्री ११.५० पर्यंत
परीक्षा केंद्र शहर जाहीर – जून पहिला आठवडा
■ हॉल तिकीट डाऊनलोड – जून दुसरा आठवडा
■ परीक्षा – १३ ते २२ जून
खुल्या प्रवर्गासाठी जास्त परीक्षा शुल्क का ?
यूजीसी नेट परीक्षेसाठी इच्छुक खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १ हजार १५० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे, तर ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि एनसीएल प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क ६०० रुपये एवढे आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांकडून ३२५ रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. मात्र या तुलनेत खुल्या प्रवर्गासाठी जास्त शुल्क का? असा सवाल या प्रवर्गातील उमेदवारांनी केला आहे.
More Stories
NTA शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी देशभरातील 33 सैनिक शाळांमध्ये इयत्ता VI आणि इयत्ता IX च्या प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE)-2024
रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत भरती – प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यू
MPSC ची संपूर्ण माहिती सविस्तर मध्ये