November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

✍️ तुळजा व सुलेमान बुद्ध लेणी कार्यशाळा अनुभव

लेणींवर जायचं म्हटलं की कितीही महत्वाचे काम असो ते बाजूला सारून कार्यशाळा घेण्यासाठी प्रथम प्राधान्य असते,
नेहमीप्रमाणे आजही महत्वाचे दोन कामे होते पण लेणी कार्यशाळा महिन्यात एकदा असते व ती मी कधीच चुकवत नसतो,
ज्या बांधवास कार्यशाळेस जायचे असतो त्याच्याकडे फक्त एकच कारण असते मी कोणत्याही परिस्थितीत लेणींवर जाणार पण ज्यांना जायचे नसते त्यांच्याकडे अनेक कारणे असतात,

समजा मला जर जायचे नसते तर माझ्याकडे दोन कारणे असे होते की ते कुणीही मान्य केले असते,
माझ्या पायाला चटका लागलेला होता त्यामुळे पाय दुखत असतानाही मी ते कारण पुढे नाही केले,
दुसरे कारण होते माझ्या अगदी जिवलग मित्राचे लग्न होते तेथे देखील आपल्या कार्यशाळा मुळें गेलो नाही,

कारण मी प्रथम प्राधान्य लेणींना देतो,
जायचं असल्याने सकाळी 3 वाजता जाग आली पण नंतर झोप लागेना ,
कारण पर्यटन स्थळे बंद केली गेली असा मेसेज फिरत होता ,
पण एकदा जायचा निश्चय केला असल्याने माघार घ्यायची नाही हेच ठरवले होते,

सकाळी ६-३० ला निश्चित केलेल्या ठिकाणी पोहचलो सर्वांची प्रतीक्षा करून झाली सर्व मागेपुढे येत येत ७-२५ ला सकाळी नाशिक वरून निघालो,

पुण्यातून मनोज गजभार व त्यांची टीम येत आहे हे समजले,
त्यानंतर रुपाली गायकवाड मॅडम व त्यांची टीम येत आहे हेही समजले ,
कल्याण मधून प्रभाकर जोगदंड व संतोष वाघमारे सर व त्यांच्या बरोब्बर धंम बांधव देखील येत होते,

अधून मधून एकमेकांना फोन चालू होते कोण कुठे पोहचले हे लोकेशन द्वारे सर्व शेअर करत होते ,
गुगल मॅपने रस्ता शोधत शोधत सुलेमान लेणींच्या पायथ्याशी पोहचलो,

जाताना आजूबाजूला असलेली हिरवळ , सागवानी झाडांना आलेला बहर डोळ्यात निसर्गाचे सौंदर्य बसत नव्हते इतके अप्रतिम निसर्ग खुलून दिसत होता,

वर चढाई करण्यास सुरुवात केली खूप दिवसांपासून सुलेमान बुद्ध लेणींवर कुणी गेले नसल्याने पायवाट पूर्ण झाकून गेली होती,

प्रभाकर सरांनी आणलेले खुरपे घेऊन आम्ही दोघे रस्ता बनवत होतो जेणेकरून महिला भगिनींना सोयीस्कर होईल,

सोबत दोरखंड आणले असल्याने त्यामुळे देखील महिलांना घेऊन जाणे सोपे झाले,
७०० ते ८०० चे अंतर वर जाण्यासाठी आहे,
आम्ही लेणींवर पोहचताच चैत्यगृहाची साफसफाई केली चैत्यस्तुपाच्या भोवताली फुलांची आरास मांडली,
सामूहिक त्रिसरण पंचशील गाथा घेऊन
बुद्ध लेणी व शिल्पकला संदर्भात माहीती उपस्थित बांधवांना सुनील खरे , प्रभाकर जोगदंड व प्रवीण जाधव यांनी दिली,

त्यानंतर उतरण्यासाठी सुरवात केली खाली आल्यावर सर्वानी वनभोजन/ स्नेहभोजन केले ,

मग पुढील दौरा तुळजा बुद्ध लेणींकडे वळाला,
तेथे पोहचत असताना पावसाच्या बारीक सरी बरसायला लागल्या,
मस्त तो शिडकावा अंगावर झेलत त्याचा मनमुरादपणे आनंद घेत लेणींवर पोहचलो तेथे त्रिसरण पंचशील झाल्यावर तेथील विशेष चैत्यस्तुपाची माहिती देण्यात आली,

यावेळी रुपाली मॅडम, नीता मॅडम, संतोष सर, प्रभाकर सर, प्रवीण सर, रितेश सर , अंभोरे सर यानी लेणी कार्यशाळा सतत येण्यासाठी आवाहन केले,

बाजूला झालेले तुळजा देवीच अतिक्रमण बघून अतिशय दुःख वाटलं
आपल्या जमिनीचा एक पांभर शेजारच्याला घेऊ न देणारे आपण त्याच्यासाठी जीव घ्यायला मागे पुढे बघत नाही
मात्र आपला वारसा आपल्या डोळ्यासमोर
कुणीतरी बळकावून घेतोय
आपण मात्र झोपेतच आहोत व राहू देखील,

सर्व माहिती ऐकत असताना बुद्ध काळात कस हरवून गेलो समजलेच नाही,
बुद्ध लेणींवरून घरी परतण्याची इच्छा होत नसतांशी बुद्धांना डोळ्यात भरून घराकडे निघालो पुन्हा त्याच ऊर्जेने पुन्हा इथंच वापस येण्यासाठी,

✍️✍️
सुनील उषा खरे
९३७००१३९५३