November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

मिलिंद महाविद्यालयाचाआज ७३ वर्धापनदिना निमित्त…..

औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय

औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय

महामानव डॉबाबासाहेबआंबेडकर यांनी स्थापनकेलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाचाआज ७३ वर्धापन दिनानिमित्त…..

जीवन जगत असतांना जीवनातल्या आनंददायी क्षणामधील एक क्षण म्हणजे ज्याची जीवनभर आठवण मनात राहील तो क्षण म्हणजे ….आपल्या बाबांच्या :- मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचा.आणि विद्यार्थी म्हणून प्राप्त झालेला बहुमान….

मिलिंद महाविद्यालयाबाबत काय लिहिणार एक शब्द माझ्यामते पुरेसा आहे…..

●●#मिलिंद म्हणजे सर्वस्व●●

विज्ञानवादी, क्रांतिकारी भीमसैनिक घडवणारी फॅक्टरी म्हणजे मिलिंद महाविद्यालय……….

या ज्ञान पाखरांनो चला नागसेनवनाकडे……. 19 जून 1950, 19 जून 2023…..

औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय म्हणजे मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीचं माहेरघर..! मराठवाडा हा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास. तिथं शिक्षणाचं बीज रोवलं तर लाखो अस्पृश्य बांधवांचा सहज उत्कर्ष होईल म्हणून पीईएस चं सर्वात मोठं जाळं औरंगाबादेतच बाबासाहेबांनी उभारलं.
आज मिलिंद महाविद्यालयाचा ७३ वा वर्धापन दिन.. आंबेडकरी चळवळीतील पहिली पिढी घडविली ती याच बाबासाहेबांच्या आपत्याने.. पुढे अनेक विद्यार्थ्यांनी या क्रांतिदालनात शिक्षण घेतलं.. त्यापैकी अनेकांनी आपलं नातं चळवळीशी जोडलं..

मिलिंद च्या महती बद्दल बोलायचे झाले तर महाविद्यालयातून बाहेर पडलेला प्रत्येकजण #मीमिलिंदचाविद्यार्थी_आहे असं अभिमानानं सांगतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिलिंद विषयी बोलतांना म्हणतात,

I like Milind because he symbolises intellectual honesty.

याशिवाय ह्या महाविद्यालयास मिलिंद हेच नाव का? त्यामागचा उद्देश काय? हे सांगतांना बाबासाहेब म्हणतात, मिलिंद हा एक बॅक्ट्रीया चा ग्रीक राजा होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमंड होती. त्याला असे वाटत होते की, ग्रीक सारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. आपल्या बुद्धिमत्तेचा मिलिंद ला गर्व चढला होता. तो सर्वांना वादविवादाने आव्हान देत असे. त्याने जगालाही आव्हान दिले होते. त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्कूसोबत वाद करावा. पण त्याच्याबरोबर वाद करावयास कोणीही तयार झाला नाही. तसं मिलिंद हा काही तत्वज्ञानी नव्हता किंवा गाढा अभ्यासक, विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवावा इतकेच माहित होते पण अशा मिलिंद बरोबर बुद्धिवाद करण्यास कोणीही तयार होईना. मिलिंद राजाचा हाच विद्वत्तेचा घमंड कमी करण्यासाठी महान प्रयासाने नागसेन नावाच्या भिक्कूला तयार केले. आणि मिलिंद चे आव्हान आपण स्वीकारावे असा नागसेनानेही निश्चय केला.

नागसेनने त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी आई-वडिलांचे घर सोडले होते. त्याने विद्येच्या, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अतिशय कष्ट घेतले. तो अत्यंत विद्वान होता. नागसेनाने महान प्रयास या भिक्खुचा आग्रह मान्य केला, नंतर मिलिंद व नागसेन यांच्यात वादविवाद सुरू झाला. त्यांचा हा वादविवाद कित्येक दिवस चालू होता. पुढे ह्या वादविवादाचे एक पुस्तक तयार झाले. त्या पुस्तकाला पाली भाषेत “मिलिंद पन्हो” असे नाव आहे. या पुस्तकाचे “मिलिंद प्रश्न” या नावाने मराठीत भाषांतरही झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, या पुस्तकाचे प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांनी वाचन करावे. कारण शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अंगी कोणते गुण असावेत हे त्या पुस्तकात सांगितले आहे म्हणूनचं बाबासाहेबांनी महाविद्यालयास मिलिंद महाविद्यालय हे नाव दिले आणि त्या परिसराला नागसेनवन हे नाव दिले.

वादविवादात मिलिंद हरला, त्याचा पराजय झाला. नंतर त्याने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. पण मिलिंद हरला व धम्माची दीक्षा घेतली झाला म्हणून बाबासाहेबांनी मिलिंद हे नाव महाविद्यालयास दिलेले नाही तर मिलिंद हा त्याच्या intellectual honesty बद्दल बाबासाहेबांना प्रिय वाटत होता. त्याचा हा आदर्श सर्वांनी नेहमी डोळ्यांसमोर ठेवावा म्हणून त्यांनी हे नाव दिलेले आहे.

हे आदर्शभूत असेच आहे असे बाबासाहेबांचे मत होते. उत्तम विद्यार्थी म्हणून मिलिंद तर उत्तम शिक्षक म्हणून नागसेन हे आदर्श आहेत. शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ आर्थिक मदत केली म्हणून त्याचे नाव शिक्षण संस्थेला देणे हे अनुचित आहे. बाबासाहेबांनी या शिक्षण संस्थेसाठी खूप नुकसान सोसले आहे, बाबासाहेबांना मिलिंद चा आदर्श आपल्या समोर ठेवावयाचा होता. मिलिंद महाविद्यालय हे एक संस्कारकेंद्र आहे, यामधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी सुसंस्कृत होऊनचं बाहेर पडला पाहिजे. असा बाबासाहेबांचा उद्देश होता.

आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण १९ जून १९५० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती. आज त्या महाविद्यालयाचा वर्धापनदिन आहे.. मिलिंदची ज्ञानाची ज्योत कायम वाढत जाऊदे.. सदिच्छा..💐💐