July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बौद्ध धम्माचा ऐतिहासिक महान वारसा धम्मभूमी थायलंड येथे तिसरी ऐतिहासिक धम्म पदयात्रा

बौद्ध धम्माचा महान वारसा धम्मभूमी थायलंड येथे रूजवण्यासाठी तिस-या ऐतिहासिक धम्म पदयात्रेचे थायलंड (बँकॉक ते नाखोन सावन) येथे आयोजन
==============
बौद्ध धम्माचा ऐतिहासिक महान वारसा धम्मभूमी थायलंड येथे रूजवण्यासाठी 100 भिक्खु, श्रामणेर संघ तसेच भारत व थायलंड येथील उपासकांचा समावेश असलेलल तिसरी ऐतिहासिक धम्म पदयात्रा दि.20 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या धम्मपदयात्रेचा प्रस्थान सोहळा थायलंडच्या बँकॉक येथे होणार असून समारोप प्राचीन बौद्ध विहार असलेल्या नाखेन सावन या शहरात होणार आहे. आश्रय सेवाभाी संस्था, त्रिरत्नभूमी सोसायटी व गगन मलिक फाऊंडेशनच्यावतीने या तिस-या ऐतिहासिक धम्मपदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर धम्मकार्याची संधी मिळत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे.
नमो बुद्धाय..!
सप्रेम जयभीम..!!
……………………
डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे
आयोजक, तीसरी धम्मपदयात्रा, थायलंड