December 25, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

थेरी संघमित्ता कृतज्ञता दिवस

२१ डिसेंबर हिवाळ्यातील सर्वात लहान दिवस हा थेरी संघमित्रा स्मरण दिवस म्हणून साजरा केला जातो.
सम्राट अशोक आणि राणी देवीची मुलगी एक अरहंत भिक्खूनी व भंन्ते महेंद्र या आपल्या भावा सोबत प्रव्रजित झालेली पुढे बुध्द धम्म शिकवणीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ही दोन्ही भावंडे श्रीलंकेत गेली.
सम्राट अशोकांनी जेव्हा कलिंग युध्दानंतर बौद्ध धर्माचा स्विकारला व गौतम बुद्धाच्या शिकवणीचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रवचनाच्या माध्यमातून त्यांचा उपदेश लोकांनपर्यंत पोहचविण्यासाठी सम्राट अशोकांनी स्वतःच्या मुलांना प्रव्रजित करुन श्रीलंकेत पाठविले आणि म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमा व हिवाळ्यातील सर्वात लहान दिवस म्हणजे २१ डिसेंबर थेरी संघमित्राच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.
सदर शिल्प हे थेरी संघमित्ताचे श्रीलंकेतील आहे.