November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

‘वॉक फॉर फ्रीडम’ हा कार्यक्रम नाशिकमध्ये यशश्वीरित्या संपन्न.

मानवी तस्करी आणि आधुनिक काळातील गुलामगिरी विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावरील ‘वॉक फॉर फ्रीडम’ हा कार्यक्रम नाशिकमध्ये यशश्वीरित्या संपन्न.
वॉक फॉर फ्रीडम हा मानवी तस्करीच्या विरोधात जागरुकता निर्माण करणारा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे, जो 50 देशांमधील 500 ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आला होता. भारतात देखील सदर कार्यक्रम एकाच वेळी एकच दिवशी संपन्न झाला. नाशिक मध्ये देखील सदर कार्यक्रमाचे आयोजन दि.१४.१०.२३ रोजी सकाळी ७:०० ते ९:०० या वेळेत करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, Vision Rescue, Mumbai, HDFC Sales या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरातील #d_r_c_ek_umeed_nashik (Disability Rehabilitation Centre Ek Umeed,Nashik)या संस्थेने आयोजित केला होता. मानवी तस्करीमुळे शिकार झालेल्या आणि बळीं ठरलेल्या लोकांसाठी एकजुटीने येऊन त्याच्यासाठी आवाज बनण्यासाठी हि मूक पदयात्रा होती.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शासकीय जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक मा.अशोक थोरात साहेब तसेच म.वि.प्र संस्थेचे सरचिटणीस व नाशिक बार असोशिएशन चे अध्यक्ष मा.नितीन ठाकरे साहेब यांनी झेंडा दाखवून केले.सदर मूक पदयात्रा गंगापूर रोड वरील मॅरेथॉन चौक मार्गे विद्या विकास विकास सर्कल येथून परत येऊन मॅरेथॉन चौक येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला.ह्या मूक पदयात्रेतून मानवी तस्करी आणि आधुनिक काळातील गुलामगिरी विषयी जागरुकता निर्माण करण्यात आली तसेच सर्व सहभागी व्यक्ती,संघटना, महाविद्यालये,विद्यार्थी, विद्यार्थीनी,युवक,युवती यांना मानवी तस्करी व गुलामगिरी विषयी वॉकमधील सहभागींना प्रथम मानवी तस्करी शोधण्याची चिन्हे तसेच राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक (1098, 181) आणि संशयास्पद क्रियांची / कामाची तक्रार करण्यासाठी स्थानिक पोलिस आणि एन.जी.ओ संपर्कांबद्दल जागरूक करण्यात आले.
वॉक फॉर फ्रीडम या पदयात्रेत नाशिक शहरातील म.वि.प्र समाजाचे समाजकार्य महाविद्यालय,व्ही.एन.नाईक महाविद्यालय,एच.पी.टी आणि आर.वाय के महाविद्यालय, के.टी.एच.एम महाविद्यालय, जि.डी.सावंत महाविद्यालय, कवियत्री बहिणाबाई समाजकार्य महाविद्यालय,जळगाव ई. महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. तसेच नाशिक शहरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा शल्यचिकित्सक मा.अशोक थोरात साहेब तसेच म.वि.प्र संस्थेचे सरचिटणीस व नाशिक बार असोशिएशन चे अध्यक्ष मा.नितीन ठाकरे साहेब.तसेच नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे फारुख शेख,प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बबलू मिर्झा,समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख सर,व्ही.एन.नाईक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक सनिम शेख सर,एच.डी.एफ.डी सेल्स चे अरुण वावधने,दै.गावकरी चे उपसंपादक चंद्रमणी पटाईट यांची उपस्थिती लाभली.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा पुष्पा वावळे,उपाध्यक्ष कविता पाईकराव तसेच सचिव ताराचंद मोतमल यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड.विनय कटारे यांनी केले तसेच सर्व सहभागींचे आभार ॲड.सुशांत परघरमोल यांनी मानले. कार्यक्रमाचे यशश्वितेसाठी दिलीप लिंगायत, बाबाजी केदारे,मनोहर आहिरे,ॲड.ड.एन.पी.सोनवणे,गणेश शिरसाठ, स्वराज नंद, संपत हिवराळे, फिरोज खान, कल्याणी आहिरे, मंगेश कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी नाशिक शहरातील शहरातील ईतर सर्व जागरूक नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. मा.नितीन ठाकरे यांचेद्वारे सर्व सहभागींना गुलामगिरी व मानवी तस्करी विरोधात जागरूकतेची शपथ देण्यात आली व राष्टगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

आपले नम्र
पुष्पा वावळे,अध्यक्षा
डी.आर.सी.एक उम्मीद,नाशिक
9764177537

ताराचंद मोतमल,सचिव
9881976443

 

#The ‘Walk for Freedom’ program was successfully completed in Nashik. #Buddhist Bharat